Jacqueline Fernandez | ‘तो जेलमधूनही मला सारखा त्रास देतोय’! जॅकलीननं सुकेशच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे केली तक्रार

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिस केवळ तिच्या चित्रपटांसाठीच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यात होत असलेल्या घडामोडींमुळेही खूप चर्चेत असते. काही काळापूर्वी या अभिनेत्रीचे नाव गँगस्टर सुकेश चंद्रशेखरसोबत (Sukesh Chandrasekhar) जोडले गेले होते, त्यामुळे ती कायदेशीर अडचणीत अडकली होती. त्याचबरोबर आता ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जॅकलीनने ठग सुकेश चंद्रशेखर विरोधात तुरुंगातून छळ आणि धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॅकलिन फर्नांडिसने (Jacqueline Fernandez) दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. जॅकलिनने विशेष पोलिस आयुक्तांना (गुन्हे शाखा) पत्रही पाठवले आहे.

सुकेश मला खूप त्रास देतो आहे. त्याच्या नावानं जेलमधून मला धमक्याही (Jacqueline Fernandez approaches Delhi Police Commissioner) येत आहेत. अशी तक्रार आता जॅकलीननं दिल्ली पोलिसांकडे केली आहे. त्यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वी देखील जॅकलीननं तिच्या एका मुलाखतीतून तिनं सुकेशबाबत अनेक खुलासे केले होते.

जॅकलीननं म्हटले आहे की, मी एक जबाबदार नागरिक आहे. सुकेशनं यापूर्वी मला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. सुकेश हा जेलमध्ये असून देखील मला कसा काय त्रास देऊ शकतो, पण त्यानं मला प्रचंड मानसिक त्रास दिल्याचे जॅकलीननं म्हटले आहे. इंडियन एक्सप्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

अशोक चव्हाणांनी राजीनामा देताच Ramdas Athawale यांची मोठी ऑफर; म्हणाले, रिपल्बिकन पक्षात…

“काँग्रेस लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असताना, सगळं काही दिलेले नेते..”, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

“कोणाबद्दल मी तक्रार करणार…”, आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया