Narayan Rane | कोकणचा ढाण्या वाघ नारायण राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार ?

Narayan Rane : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Elections) उमेदवारांची दुसरी यादी भारतीय जनता पक्षानं (BJP) काल जाहीर केली. राज्यातून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये रितसर प्रवेश केला. भाजप कडून त्यांना आता राज्यसभेवर पाठवले जाणार आहे यावर देखील शिक्कमोर्तब झाले.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे (Narayan Rane) राज्यसभेतून निवृत्त झाल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का, याकडे सगळ्याचे लक्ष लागले होते. परंतु, अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भाजप प्रवेशाने सर्व समीरकरणे बदलली आहेत.

भाजपला कोणताही धोका न पत्कारता अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवायचे आहे. उर्वरित दोन जागांवर वर्णी लागण्यासाठी भाजपमध्ये प्रचंड अंतर्गत रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे नारायण राणे आणि पियूष गोयल या दोन राज्यसभेच्या खासदारांना यंदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे अशी चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या

Medha Kulkarni | “..एवढीच मागणी मी पक्षाकडे केली होती”, राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया

Rajyasabha Election: राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल राज्यसभेवर जाणार

महायुतीच्या उमेदवारांची यादी पाहून किव येते, भाजपसाठी जीव ओतलेल्यांनाच जागा नाही – Nana Patole