जे स्वतःला चाणक्य समजत होते त्यांना मात देणारे पवारसाहेब हे चाणक्य आहेत – नवाब मलिक

मुंबई – आम्ही ममतादीदी सोबत राहणार की कॉंग्रेससोबत राहणार याची चिंता काहींना वाटतेय परंतु जे स्वतःला चाणक्य समजत होते त्यांना मात देणारे पवारसाहेब चाणक्य आहेत हे लक्षात घ्यावे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले आहे.

या राज्यात शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र येतील असे कधी कुणी स्वप्नातही पाहिले नव्हते तशीच परिस्थिती या देशात होणार आहे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

बरेच लोक आहेत जे कधी सोबत येणार याची चर्चा होत नाही परंतु या सगळ्यांची मोट बांधण्याचे काम पवारसाहेब करतील. कुणालाही याच्यातून बाहेर काढून ही आघाडी होणार नाही. सगळ्यांचा समावेश करायचा आहे यादृष्टीने पवारसाहेब काम करत आहेत असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

या देशात विविध प्रश्न निर्माण झाल्यावर ज्यापध्दतीने युपीएच्या बैठका झाल्या पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत ही सत्य परिस्थिती आहे. आम्हाला या देशात ममतादीदी, टीआरएस, सपा, आरजेडी, दक्षिणेतील पक्ष या सर्वांची मोट बांधायची आहे. कॉंग्रेससह एक नवीन आघाडी तयार करायची आहे. सामुहिक नेतृत्व निर्माण करुन ही आघाडी काम करेल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

ममता बॅनर्जी या दोन दिवसाच्या दौर्‍यावर असताना त्यांनी पवारसाहेबांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आमच्या मंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी देशात मोदी सरकारच्याविरोधात असंतोषाचे वातावरण असून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक नवीन पर्याय देण्याची गरज असल्याचे मत मांडले. त्यावर पवारसाहेबांनी आम्ही सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

काँग्रेसला वगळून आघाडीचा प्रयत्न भाजपालाच मदत करणारा – नाना पटोले

Next Post

कुणी कितीही स्वप्न पाहिली तरी मुंबईच आर्थिक राजधानी राहणार – नवाब मलिक

Related Posts
ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबतच...; फडणवीसांनी ठाकरेंना सुनावले खडेबोल

ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबतच…; फडणवीसांनी ठाकरेंना सुनावले खडेबोल

मुंबई – गेल्या कधी दिवसांपासून राज्याचे ठाकरे गट आणि भाजपमधील संघर्ष वाढला असून यात भाषेची मर्यादा देखील अनेकदा…
Read More
जिल्ह्यातील ३०३ कोटींच्या विकासकामांना पालकमंत्र्यांची मंजुरी

जिल्ह्यातील ३०३ कोटींच्या विकासकामांना पालकमंत्र्यांची मंजुरी

पुणे  –राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा…
Read More

190kmच्या रेंजसह स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, किंमत फक्त 53,000 रुपयांपासून सुरू, जाणून घ्या खासियत

नवी दिल्ली – भारतात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या सर्वच इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आल्या असून आता…
Read More