“मी तिला सोडणार नाही”, गंभीर आरोप करत तनुश्री दत्ताने राखी सावंत विरुद्ध नोंदवला FIR

Tanushree Dutta: तनुश्री दत्ता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तनुश्रीने काही दिवसांपुर्वी राखी सावंतचा (Rakhi Sawant) पती आदिल खान (Adil Khan) सोबत प्रेस कॉन्फरन्स घेऊन राखी सावंतवर गंभीर आरोप केले होते. आता तनुश्रीने राखी सावंतविरुद्ध FIR नोंदवत तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

तनुश्री दत्ताने यासंदर्भात मीडियाशी संवाद साधला आणि म्हणाली, “मी 2018 मध्ये मी टू चळवळीदरम्यान झालेल्या मानसिक आघातासाठी राखी सावंतविरोधात एफआयआर (FIR Against Rakhi Sawant) दाखल करण्यासाठी आले आहे. अनेक कारणांमुळे एफआयआरमध्ये अनेक दंड संहिता जोडण्यात आल्या आहेत. तिने माझ्याविरोधात दिलेल्या प्रत्येक वक्तव्याची आम्ही नोंद केली आहे. यावेळी तिला सोडणार नाही. आता प्रक्रिया सुरू झाली आहे, पोलीस लवकरच कारवाई करतील आणि मी त्यांना संपूर्ण पार्श्वभूमी उपलब्ध करून दिली आहे.”

तनुश्री आणि राखीमध्ये कसा वाद सुरू झाला?
तनुश्रीनेही प्रत्यक्षात काय घडले ते शेअर केले. ती म्हणाला, “पार्श्वभूमी अशी आहे की हॉर्न ओके प्लीज या चित्रपटादरम्यान राखीला काढून मला चित्रपटात समाविष्ट केले गेले होते आणि नंतर नाना पाटेकर यांच्याशी झालेल्या वादानंतर त्यांनी पुन्हा राखीला परत घेतले गेले. माझे नाव वापरून चित्रपटाचे प्रमोशन केले गेले. चित्रपट निर्मात्यांनीही माझे सर्व चेक बाऊन्स केले. हे सर्व नियोजित होते आणि राखी त्याचा एक भाग होती.”

तनुश्रीने तिच्या आघाताबद्दल सांगितले की, “राखीमुळे मी खूप भावनिक आणि मानसिक आघातातून गेले आहे. तिने माझ्याबद्दल अशा भयानक गोष्टी बोलल्या होत्या. मला ते सहन होत नव्हते. राखीकडे प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रत्येक पर्याय आहे. दरवर्षी एक नवीन नाटक. तिने माझी संपूर्ण प्रतिष्ठा उध्वस्त केली. तिने माझ्या वैयक्तिक जीवनावर हल्ला केला, तिच्यामुळे मी लग्न करू शकले नाही. राखी खूप दिवस माझा छळ करत राहिली.” असेही तनुश्रीने म्हटले.

महत्वाच्या बातम्या-

महिलांनो रस्त्यावर उतरा,सरकार केसेस टाकेल, पण तरीही घाबरु नका ; शरद पवारांचा सल्ला

उबाठा गटाने दादाजी भुसे यांच्यावर केलेले आरोप म्हणजे ‘अंधारा’त तीर मारण्याचा प्रयत्न – शीतल म्हात्रे

महाराष्ट्रातून १०० टक्के पंतप्रधान मोदींनाच समर्थन! चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा