भोंगे जातील की नाही ठाऊक नाही, पण राज ठाकरे हा भाजपला सापडलेला नवा भोंगा आहे! – वागळे 

मुंबई – गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत  राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर काल झालेल्या सभेत ठाण्यात राज ठाकरेंनी महाविकास आघाडीची चांगलीच धुलाई केली. राज्यात सुरु असलेलं गलिच्छ राजकारण,  मराठा आरक्षण ( Maratha reservation ),ओबीसी आरक्षण ( OBC reservation ), विजेची समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, राष्ट्रवादीचा जातीयवाद, समान नागरी कायदा, भ्रष्टाचार यासह प्रखर हिंदुत्ववादी भूमिका मांडली.

यावेळी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या भोंग्यांच्या मुद्द्यावर देखील काल ठाकरे यांनी भाषण केले. सोबतच राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिलाय. राज्य सरकारला मला सांगायचं आहे की मशिदीच्या भोंग्यांवरून आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे,” असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. तसेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर देशात जिथं नमाज वाजेल तिथं हनुमान चालिसा लावणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. ते ठाण्यातील उत्तरसभेत बोलत होते. न्यायालयाच्या निकालाचे पालन सरावणी करायलाच हवे असं त्यांनी सांगिलते.

दरम्यान, राज ठाकरे यांनी घेतलेल्या या टोकाच्या भूमिकेवरून काहींनी त्यांचे समर्थन केले आहे तर काही त्यांच्यावर टीका करत आहेत. यातच आता पत्रकार निखील वागळे यांनी भाष्य केले असून राज ठाकरे यांना भाजपचा भोंगा त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, भोंगे जातील की नाही ठाऊक नाही, पण राज ठाकरे हा भाजपला सापडलेला नवा भोंगा आहे! असं वागळे यांनी म्हटले आहे.