संपूर्णपणे इथेनॉल वर चालणाऱ्या जगातील पहिल्या मोटार गाडीचं गडकरींच्या हस्ते उद्घाटन

Nitin Gadkari : संपूर्णपणे इथेनॉल (Ethanol) वर चालणाऱ्या जगातील पहिल्या मोटार गाडीचं उद्घाटन, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी करून वाहनांमधील इंधन कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं हे एक मोठं पाऊल असून हा दिवस ऐतिहासिक असल्याचं गडकरी म्हणाले.

वाहनांमुळे होणारं प्रदूषण ही चिंतेची बाब असून हे प्रदूषण रोखण्यासाठी देशात शाश्वत आणि कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी देशाचं तेल आयातीवर अवलंबून राहणं कमी करुन इथेनॉल मिश्रित इंधनाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. यामुळे देशाच्या कृषी क्षेत्राचा विकास होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

चोरीच्या संशयावरून दलित मुलांना अमानुष मारहाण प्रकरण; रामदास आठवले हरेगावला जाणार

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यावेळी उपस्थित होते. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाला परवानगी दिल्यानं आयातीसाठी दरवर्षी द्याव्या लागणा-या 35 हजार कोटी रुपयांची बचत होईल असं पुरी म्हणाले.