पत्नीने दोन्ही मुलींचं अपहरण केलंय…; महाभारतातील ‘कृष्णा’ची विभक्त पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार

Nitish Bhardwaj: महाभारतात कृष्णाची भूमिका करणारे अभिनेते नितीश भारद्वाज (Nitish Bhardwaj) यांनी आपल्या विभक्त पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. भारद्वाज यांच्या पत्नी स्मिता भारदवाज मध्य प्रदेश कॅडरच्या आयएएस अधिकारी आहेत. तक्रारीमध्ये नितीश भारद्वाज यांनी म्हटलंय की स्मिता भारद्वाज (Smita Bharadwaj) या खूप काळापासून त्यांचा मानसिक छळ करत आहेत.

नितीश भारद्वाज (Nitish Bhardwaj) यांनी भोपाळ पोलीस आयुक्तांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. त्यांनी आयुक्तांकडे मदत मागितली आहे. भारद्वाज तक्रारीमध्ये म्हणालेत की, विभक्त पत्नी आपला मानसिक छळ तर करतच आहे. शिवाय पत्नीने आपल्या दोन मुलींचे अपहरण केले आहे आणि ती आपल्याला त्यांना भेटू देत नाही.

भोपाळचे पोलीस आयुक्त हरिनारायणचारी यांनी बातमीची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, आम्हाला नितीश भारद्वाज यांची तक्रार मिळाली आहे. आम्ही याप्रकरणात तपास करत आहोत. सत्य समोर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. नितीश भारद्वाज यांनी प्रसिद्ध टिव्ही शो महाभारतामध्ये कृष्णाची भूमिका केली होती. महाभारतामधील त्यांची भूमिका चांगलीच प्रसिद्ध आहे. कृष्णाची भूमिका करुन ते भारतातील घराघरात पोहोचले होते.

२००९ मध्ये झाले होते लग्न
नितीश भारद्वाज यांचे स्मिता यांच्यासोबत मार्च २००९ मध्ये लग्न झाले होते. स्मिता या मध्य प्रदेश कॅडरच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांची एका सामाईक मित्राच्या माध्यमातून भेट झाली होती. त्यांना दोन जुळ्या मुली आहेत. ज्या ११ वर्षांच्या आहेत. १२ वर्षांच्या नात्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांनी अधिकृत घटस्फोट घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी अजितदादांचीच, शरद पवार यांना मोठा धक्का

Jagdish Mulik | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी जगदीश मुळीकांच्या उमेदवारीची शक्यता वाढली

Surya Ghar Yojana | मोफत वीज योजनेसाठी नोंदणी झाली सुरू, असा करू शकता अर्ज