ठाकरे कुटुंबातील चौघांपैकी एकजण आठ दिवसांत जेलमध्ये जाणार; पहा कुणी केली भविष्यवाणी

मुंबई – ठाकरे कुटुंबातील चौघांपैकी एकजण जेलमध्ये जाणार असल्याची भविष्यवाणी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई पुढील आठ दिवसांत होणार असल्याचं देखील शिरसाट म्हणाले आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कोरोना काळात झालेला भ्रष्टाचार आणि मुंबईतील रस्ते घोटाळ्यात ठाकरे कुटुंबातील चौघांपैकी एकजण जेलमध्ये जाणार आहे. ईडीकडून पुढील आठ दिवसात ही कारवाई होऊ शकते, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

साडेसहाशे रुपयांची बॉडी बॅग तब्बल साडेसात हजारात विकत घेण्यात आली. दरम्यान याचवेळी बोलताना शिरसाट म्हणाले की, कोविड सेंटर घोटाळ्यात बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा प्रकार हा फक्त छोटासा भाग आहे. यात अनेक असे प्रकरण असून, त्यात मागे चौकशी देखील झाली. यात जे 16 ते 17 कंत्राटदार आहेत त्यांच्यावर देखील ठपका ठेवण्यात आला आहे. मग ते कंत्राटदार कोणाचे होते, त्यांना कोणी विना टेंडर कंत्राट टेंडर दिले. साडेसहाशे रुपयांची बॉडी बॅग तब्बल साडेसात हजारात विकत घेण्यात आली. त्यामुळे, या प्रकरणात ईडीने चौकशी सुरु केली आहे. त्याच्यामध्ये अनेक लोकांची नावं आली आहे. पण, यावर पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीने अधिकृतरीत्या यावर प्रतिकिया दिली नाही. तसेच हे चुकीचं असल्याचं देखील कोणी म्हटले नसल्याचं, शिरसाट म्हणाले.