स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून पाकिस्तान-अफगाणिस्तान आमने-सामने; अफगाणी नेते भडकले

Pakistan vs Afghanistan: पाकिस्तानवर, अफगाण स्थलांतरितांना अत्यंत दडपशाही पद्धतीने हाकलून देण्याचा आणि त्यांना त्यांच्या मायदेशी परतण्याचा आग्रह धरल्याचा आरोप अफगाणिस्तानमधील तालिबान-नियुक्त उप परराष्ट्र मंत्री शेर मोहम्मद अब्बास स्टॅनिकझाई यांनी अफगाणिस्तानात एका जाहीर भाषणात केला आहे.

अशा अत्याचारांमुळे 1971 मध्ये बांगलादेश पाकिस्तानपासून विभक्त झाल्याच्या घटनेसारखी पुनरावृत्ती घडू शकते असा इशारा त्यांनी दिला. पाकिस्तानातील पश्तूनांची भूमी पाकिस्तानची नसून पश्तून जमातींमधील एकता त्यांच्या स्वातंत्र्यासाठी महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं.

ड्युरंड रेषेनं अफगाणिस्तानचा अर्धा भाग त्यांच्यापासून विभागला गेला आहे, असं सांगून ते म्हणाले की, अफगाणिस्थानं ड्युरंड रेषा कायदेशीर सीमा म्हणून कधीही स्वीकारली नाही आणि भविष्यातही तशी शक्यता नाही.

महत्वाच्या बातम्या-

ऐतिहासिक! रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताचा इंग्लंडवर सर्वात मोठा विजय, ४३४ धावांनी जिंकली कसोटी

Sunetra Pawar | सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान निर्माण करणाऱ्या सुनेत्रा पवार नेमक्या कोण आहेत?

Ambernath | धक्कादायक ! चोरीच्या संशयातून दोन तरुणांना जमावानं बेदम मारहाण करून संपवलं