Pune News | पुणेकरांचे डिजिटलायझेशन मधील योगदान महत्वाचे – डॉ. प्रमोद वर्मा

Pune News | भारतात झपाट्याने झालेल्या डिजिटल क्रांतीमुळे (Digital revolution)  यु.पी.आय आधार कार्डमुळे संपूर्ण देश व देशातील नागरिकांना एक संघ जोडण्यात भारताला यश आले. यु.पी.आय सध्या जगभरातील जवळपास 10 देशात सर्रासपणे वापरले जाते. डिजिटलवरील डीपीजी टेक फ्यूजनवरती आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. प्रमोद वर्मा (Dr. Pramod Verma) बोलत होते.

सनबर्ड समूह आणि टेकडी टेक्नॉलॉजीस् ने या परिषदेचे आयोजन सिंबोयसिसचे ईशान्य सभागृह विमाननगर येथे (Pune News) केले होते. एकस्टेप फाउंडेशनचे प्रमुख मधुचंद्रा आर, सह संस्थापक टेकडी टेक्नॉलॉजीस् चे पार्थ लवाटे, संतोष वसाभक्तुला, शशि कुमार गणेशन, निखिल वेल्पनूर, दीनानाथ खोलकर, अतुल तुळशीबागवाले, मंदार वधावेकर हे मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना माजी मुख्य आर्किटेक्ट आधार, युपीआय आणि इंडिया स्टॅक, सिटिओ एकस्टेप फाउंडेशनचे डॉ. प्रमोद वर्मा म्हणाले की भारत नवीन स्केल आणि गतीसह डिजिटल पायाभूत सुविधांच्या उभारणीत धोरणात्मक बदल करत आहे. डिजिटल सार्वजनिक वस्तू (डीपीजी), डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डीपीआय) नवीनता आणि सर्जनशीलताला चालना मिळत आहे. भारत नवीन स्केल आणि गतीसह डिजिटल पायाभूत सुविधांच्या उभारणीत धोरणात्मक बदल करत आहे हे लक्षात घेऊन नवोदित हे परिवर्तनाची प्रेरक शक्ती आहेत.  त्यांनी नवोन्मेषकांना आणि स्टार्ट-अप्सना मार्केट इनोव्हेशनचा अवलंब करण्याचे ओपन स्टँडर्ड्स आणि डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापर करून विकास आपण जलद गतीने करू शकतो.

अनेक देश खरोखरच शाश्वत आर्थिक विकासाच्या शक्यतेची पुनर्कल्पना करत आहेत आणि ते कसे करता येते हे भारताने जगाला दाखवून दिले आहे,” डीपीआय क्षेत्रातील चांगल्या तंत्रज्ञान कौशल्यांसह नवोन्मेषकांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी आणि तरुणांमध्ये नवोपक्रम आणि उद्योजकतेची भावना बिंबवली पाहिजे. यासाठी तरुणांनी व तंत्रज्ञानामध्ये कार्यरत असणाऱ्या तरुणांनी या परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला होता. पुढील तीन वर्षांमध्ये, भारताचा क्रेडिट सिस्टीम, लॉजिस्टिक आणि ई-कॉमर्स सारख्या क्षेत्रांमध्ये योगदान मोठे असेल. डिजिटल क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी पुणेकरांची आहे. पुणेकरांचे डिजिटलायझेशन मधील योगदान महत्वाचे हे नेहमी देशाच्या लक्षात राहील. उद्या (ता.२३) सकाळी १०.०० वा. पर्सिस्टंट सिस्टमचे मुख्य आनंद देशपांडे हे डिजिटलायझेशन वरती मार्गदर्शन करणार आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क
रामकुमार शेडगे जनसंपर्क मिडिया सर्व्हिसेस 9890775696

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आमची लढाई – Muralidhar Mohol

Eknath Shinde | मोदींना औरंगजेबाची उपमा देणं म्हणजे देशद्रोह, एकनाथ शिंदे यांचा संजय राऊत यांच्यावर हल्ला

Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होताच पुण्यातील कॉंग्रेसमधील जेष्ठ नेता नाराज