Prarthana Behere | अभिनेत्री प्रार्थना बेहेरेकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, झाली प्रचंड ट्रोल

Prarthana Behere  : काल शिवजयंतीनिमित्त राज्यभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान लातूरच्या उदगीर येथील एका मॉलच्या उद्धाटनासाठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) दाखल झाली होती. त्यावेळी उद्धाटनादरम्यान प्रार्थनाने छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केला. तिच्या या कृतीमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

प्रार्थना बेहेरे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे एका व्यापारी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी आली होती. यावेळी तिने छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर शिवप्रेमींनी उदगीर शहरामध्ये अभिनेत्रीचे लागलेले बॅनर फाडत संताप व्यक्त केला. तसेच प्रार्थनाने आता माफी मागावी, अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

Jayant Patil भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

भाजपसोबत युती करणार का?; आशिष शेलार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय म्हणाले?

मनसे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीसह जाणार? आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, तासभर चर्चा