पुरोगामी महाराष्ट्र जातीपातीला कधी थारा देणार नाही – रोहित पाटील

सांगली – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray) यांची बहुचर्चित सभा नुकतीच पार पडली. आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याने अवघ्या देशाचे लक्ष राज ठाकरे यांनी स्वतःकडे वेधून घेतले असताना आज राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जातीयवादाचा आरोप करत आपल्या खास शैलीत समाचार घेतला.

दरम्यान, आता राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील ( young leader of NCP Rohit Patil ) यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. राज ठाकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या आरोपवर प्रत्युत्तर देताना रोहित पाटील म्हणाले,  हल्ले हे नेहमी शक्तीस्थळावरच केले जातात,असे सांगत पवार साहेब महाराष्ट्राचे नेतृत्व देशभर करत आहेत.म्हणूनच महाराष्ट्राचे एक शक्तिस्थळ म्हणूनच त्यांच्यावर टीका केली जाते. पण जातीपातीचे राजकारण (Caste politics) करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता थारा देणार नाही,असे सांगत राज्यात लोकांना भरकटवायच काम केले जातंय,असा आरोपही रोहित पाटील यांनी केला. राज्यातील जनता शांततेलाच वाव देतील, असा विश्वासही रोहित आर पाटील यांनी व्यक्त केला.