Mahashivratri | महाशिवरात्री यात्रेत भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करा – जिल्हाधिकारी  

गडचिरोली  : महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी, निवास, आरोग्य, स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना…
Mahashivratri | महाशिवरात्री यात्रेत भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करा - जिल्हाधिकारी  

गडचिरोली  : महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी, निवास, आरोग्य, स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या. यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशा सूचना जिल्हाधिकारी संजय मीणा (Sanjay Meena) यांनी आज दिल्या.

जिल्ह्यात मार्कंडेश्वर तीर्थक्षेत्र, चपराळा देवस्थान,  महादेव डोंगरी यासह विविध ठिकाणी महाशिवरात्री (Mahashivratri) निमित्त 8 मार्चपासून यात्रा प्रारंभ होत आहे. या यात्रेच्या नियोजना संदर्भात संजय मीणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा घेतला. त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपविभागीय अधिकारी ओंकार पवार, विवेक सांळुके, उत्तम तोडसाम, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसिलदार तसेच मार्कंडा, चपराळा व पळसगाव येथील मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

यात्रेच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त, नियंत्रण कक्ष, धर्मशाळेची दुरूस्ती,  औषधाचा पुरेसा साठा व वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपलब्धता, पथदिवे, अखंडित विद्युत पुरवठा, मोबाईल शौचालयाची व्यवस्था, भाविकांसाठी पुरेशा बसेस, अग्निशमन यंत्रणा व रुग्णवाहिका आदी आवश्यक सोयी सुविधा भाविकांसाठी सुसज्ज ठेवण्याचे व संबंधित विभागाला नेमून दिलेले कामे व्यवस्थितपणे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मीणा यांनी दिले. तसेच यात्रेदरम्याने दुर्घटना घडू नये यासाठी संबंधीतांना गॅस सिलेंडर वापरण्यास मनाई करण्याच्या सूचना देण्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

जिल्हाधिकारी यांनी मंदिर व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून यात्रेसाठी अतिरिक्त सुविधेच्या आवश्यकतेबाबत विचारणा करून माहिती जाणून घेतली. चपराळा येथे पाण्याची मोटर, मार्कंडा येथे पोलिस बचाव पथकाला बोट व आवश्यक तेथे दुरूस्ती व डागडुजी आदी बाबींसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. बैठकीला महसूल, पोलिस, वन, सार्वजनिक बांधकाम, नगरपंचायत, दूरसंचार, अन्न व औषध प्रशासन, ग्रामपंचायत, परिवहन व संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या : 

Loksabha Election: भाजपकडून लोकसभेसाठी २३ निवडणूक निरीक्षकांची घोषणा, वाचा संपूर्ण यादी

Rohit Pawar – फडणवीसांवर बोलल्यावर एसआयटी लागते, पेपर फुटी करणाऱ्यांवर कारवाई का नाही?

Pankaja Munde | पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढणार नाहीत? भाजपच्या ‘त्या’ यादीत आलं नाव

Previous Post

Rajesh Kshirsagar – अमृत २.० अभियानाअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेस रु.१५२ कोटींचा निधी मंजूर

Next Post
Marathi movie | 'भागीरथी missing' मराठी चित्रपट महिला दिनी होणार प्रदर्शित

Marathi movie | ‘भागीरथी missing’ मराठी चित्रपट महिला दिनी होणार प्रदर्शित

Related Posts
Eknath Shinde | राज्यात विकासाची गंगा वाहतेय,पाऊणे दोन वर्षात शेतकऱ्यांना ४५ हजार कोटींचे वाटप

Eknath Shinde | राज्यात विकासाची गंगा वाहतेय,पाऊणे दोन वर्षात शेतकऱ्यांना ४५ हजार कोटींचे वाटप

Eknath Shinde | राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महायुती सरकारने पाऊणे दोन वर्षात ४५ हजार कोटींचा निधी दिला आहे. राज्यात…
Read More
दरारा.. वाघाचा काल पण आज पण आणि उद्याही; मोदींच्या काळाराम मंदिर भेटीवरुन ठाकरे समर्थकाची पोस्ट व्हायरल

दरारा.. वाघाचा काल पण आज पण आणि उद्याही; मोदींच्या काळाराम मंदिर भेटीवरुन ठाकरे समर्थकाची पोस्ट व्हायरल

Narendra Modi At Kalaram Temple:- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी नाशिक येथील…
Read More
NCP | संभाजी ब्रिगेडच्या राज्यभरातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा 'देवगिरी'वर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

संभाजी ब्रिगेडच्या राज्यभरातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा ‘देवगिरी’वर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Sambhaji Briged: – संभाजी ब्रिगेडच्या शेकडो आजी – माजी कार्यकर्त्यांनी आज अजित पवार यांना समर्थन देत देवगिरी या…
Read More