Narayan Rane | रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार ठरला; अखेर नारायण राणेंचं नाव जाहीर!

Narayan Rane | लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी तसेच वंचित बहुजन आघाडी अशी राज्यात लढत होत असून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane ) यांना उमेदवारी मिळण्याच्या चर्चा होत्या. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच या मतदारसंघात त्यांनी प्रचार सभांचा धडाका सुरु केलाय.

अखेर या जागेचा तिढा सुटला असून हा मतदारसंघ भाजपच्या (BJP) पारड्यात पडला आहे. अखेर या जागेवर नारायण राणेंचं नाव जाहीर झालं आहे. त्यामुळे आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात दुरंगी लढत पाहायला मिळेल.

रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघात २०१९ मध्ये विनायक राऊत आणि डॉ.नीलेश राणे यांच्यामध्ये लढत झाली होती. राऊत यांनी शिवसेना -भाजप युतीकडून लढविली होती तर राणे यांनी स्वाभिमान पक्षातून उभे होते. या लढतीत राऊत यांनी बाजी मारली होती.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Narendra Modi | मोदीजींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, शिंदेंचा विरोधकांवर घणाघात