Gopal Kulkarni | गोपाळ कुलकर्णी यांच्या ‘गोपाळकाला’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

पुणे | सेवानिवृत्त शिक्षक गोपाळ कुलकर्णी (Gopal Kulkarni) यांच्या ‘गोपाळकाला’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सिटी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, जयराज ग्रुपचे अध्यक्ष राजेश शहा आणि शल्यचिकित्सक डॉ. शिवमूर्ती खंडाळकर यांच्या हस्ते झाले.

अचलेर ता. लोहारा, जि. धाराशीव येथील सेवानिवृत्त शिक्षक गोपाळराव कुलकर्णी (Gopal Kulkarni) गुरूजी यांच्या ‘गोपाळकाला’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अनिरूध्द देशपांडे व्यवस्थापकीय संचालक सिटी ग्रुप, राजेश शहा चेअरमन जयराज ग्रुप, निष्णात सर्जन डॉ. शिवमुर्ती खंडाळकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात  प्रदीप कटारीया, राम कुतवळ, डॉ. प्रभाकर महाजन, डॉ. गोविंद कुलकर्णी, शामराव कुलकर्णी, गुरुर्जीचे नातेवाईक विवेक कुलकर्णी यांचा मित्रपरीवार उपस्थित होता. याच कार्यक्रमामध्ये आयकर अधिकारी रामप्रसाद यांचा अनिरूध्द देशपांडे यांच्या हस्ते सेवानिवृत्ती निमित्त सत्कार केला व  सत्यसाई सेवा संघटनेला डोळयांच्या ऑपरेशनस् साठी मदतनिधी दिला.

यावेळी अनिरूध्द देशपांडे,  राजेश शहा यांनी पुस्तक प्रकाशनासाठी शुभेच्छा दिल्या. मुळचे अचलेर ता. लोहारा, जि. धाराशीव येथील विद्या विकास विद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले डॉ. शिवमुर्ती खंडाळकर यांनी गोपाळराव कुलकर्णी गुरूजी सारख्या ध्येयवादी गुरूं मुळे चांगले संस्कार मिळाले व माझ्या सारखी चांगली पिढी घडली. आज या निमित्ताने गुरूंच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला उपस्थित राहून हे ऋण व्यक्त करण्याची संधी मिळाल्याचे सांगितले.

प्रास्ताविक  विवेक कुलकर्णी यांनी केले. आईचे निधन झाल्यानंतर वडिल गोपाळराव कुलकर्णी यांनी राष्ट्र, निसर्ग, तरूण या विषयांवर कविता केल्या. त्याचे प्रकाशन व्हावे अशी इच्छा वडिलांनी व्यक्त केली. आयुष्यभर लोकांसाठी काम केलेल्या एक ध्येय वेडया शिक्षकाचे संस्कार आमच्या पिढीला मिळाल्यामुळे संवेदनशिलता आम्ही जपत आहोत. वडिलांनी महिलांना रोजगार मिळवुन दिला, यात्रेमध्ये पाण्याची सोय केली, वृक्षारोपण केले असे सांगत त्यांनी वडिलांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली.

याप्रसंगी प्रदीप कटारिया, राम कुतवळ, डॉ. प्रभाकर महाजन, डॉ. गोविंद कुलकर्णी, शाम कुलकर्णी आदी उपस्थित होते.या वेळी सत्यसाई सेवा संघटनेला नेत्रशस्त्रक्रियेसाठी मदतनिधी सुपूर्द करण्यात आला.गंधाली देसाई यांनी सूत्रसंचालन केले. वैदेही कुलकर्णी यांनी आभार मानले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol: “बोलायला गेलो तर खुप काही निघेल, परंतु…,” सुप्रिया सुळेंना मोहोळांनी दिलं प्रत्युत्तर

मोदीजींची गॅरेंटी म्हणजे, गॅरेंटी पूर्ण होण्याची गॅरेंटी! भाजपाच्या संकल्पपत्रावर मुरलीअण्णांची प्रतिक्रिया

Sharad Pawar: आश्वासनाची पूर्तता न करणे हे भाजपचे वैशिष्ट्य, शरद पवारांचा घणाघात