फक्त एक ‘किस’ दे म्हणत ७२ वर्षाच्या म्हाताऱ्याने अधिकारी महिलेचा केला विनयभंग

Pune Crime News: तु मला आवडतेस मला फक्त एक ‘किस’ दे म्हणत पुण्यात एका ७२ वर्षीय वृद्ध व्यक्तीने कामावर असताना सहकारी अधिकारी महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Man Forcibly Kisses colleague) आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून डेक्कन पोलिस ठाण्यात फुले वस्तू संग्रहालयाचे सचिवांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजीव विनायक विळेकर असं गुन्हा दाखल झालेल्या वृद्धाचं नाव आहे.

ही घटना १३ डिसेंबर रोजी दुपारी पावणेबाराच्या सुमारास घडली. यासंर्भात मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (१७ डिसेंबर) महिला कामावर असताना आरोपी तिच्याजवळ आला. त्याने पीडितेकडे मला तु आवडतेस असं म्हणत किसची मागणी केली. त्यानंतर ‘तुला प्रॉब्लेम असेल तर आपण दरवाजा लावून घेऊ’ असे म्हणत बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.

या संपूर्ण प्रकारानंतर पीडितेने तातडीने डेक्कन पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारी नंतर विनायक विळेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात श्रीराम अक्षता कलशाचे पूजन; पुणेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती

Sunrisers Hyderabad Full Squad: सनरायझर्स हैदराबाद पूर्ण संघ,यंदा पॅट कमिन्सपासून हे खेळाडू संघाचा भाग बनले