Pune News | क्रीडा-संबंधी सामान्य दुखापती आणि त्यांचा प्रतिबंध

Pune News | डॉ. आनंद जाधव, सल्लागार, ऑर्थोपेडिक, मणिपाल हॉस्पिटल, बाणेर, पुणे – क्रीडा (Pune News) संबंधी दुखापती असतात त्या खूप जास्त क्रियाकलाप, आघात किंवा एखादा अवयव जितका जोर सहन करू शकतो, त्यापेक्षा जास्त जोर दिल्यामुळे उद्भवतात. क्रीडा संबंधी दुखापती दोन प्रकारच्या असतात: तीव्र (अक्यूट) आणि जुनाट (क्रॉनिक). यापैकी खेळाडूंमध्ये तीव्र दुखापती होणे अधिक सामान्य असते. तीव्र दुखापती म्हणजे अशा दुखापती, ज्या अचानक होतात. उदाहरणार्थ अनपेक्षित उडीमुळे, लॅंडींगमुळे पायाचा घोटा मुरगळणे.

पायाचा घोटा मुरगळणे ही क्रीडा-संबंधी सामान्य दुखापत आहे, ज्याच्यामुळे सूज येऊ शकते, वेदना होऊ शकते आणि पाय आखडू शकतो. दुसरी सामान्य इजा म्हणजे खरचटणे. त्वचेवर काही आपटल्यामुळे किंवा त्वचा कशावर तरी घासली गेल्यामुळे त्वचा खरचटते. कंकशन म्हणजे डोक्याला मार लागल्यामुळे होणारे मामुली नुकसान. त्याची लक्षणे असतात डोकेदुखी, गरगरल्यासारखे वाटणे आणि क्षणिक स्वरूपात होणारा स्मृति-भ्रंश. या व्यतिरिक्त खेळाडूंना त्वचा कापणे, ओरखडा येणे यांसारख्या इजांना देखील तोंड द्यावे लागते. या इजा प्रामुख्याने हात आणि गुडघ्याला होतात. खेळाडूंच्या बाबतीत डीहायड्रेशन ही देखील समस्या होऊ शकते. मोठ्या प्रमाणात डीहायड्रेशन झाल्यामुळे उष्माघात किंवा उष्णतेमुळे थकवा यांसारखे उष्णतेशी संबंधित विकार होऊ शकतात.

आणखी एक चिंतेचा विषय म्हणजे दातांना नुकसान होणे. जबड्याला मार लागल्यामुळे दात तुटू शकतात, दुभंगू शकतात किंवा हलू शकतात. या व्यतिरिक्त मांडीला खेच बसू शकते. मांडीचे स्नायू जास्त खेचले गेल्याने अस्वस्थता आणि अॅनिमियासारखी लक्षणे दिसू शकतात. योग्य काळजी घेतल्यास खेळताना अशा प्रकारच्या दुखापती होण्याचा धोका टाळता येऊ शकतो. योग्य काळजी म्हणजे योग्य वॉर्मिंग अप करणे, संरक्षणात्मक साधनांचा वापर, हायड्रेटेड राहणे आणि योग्य तंत्र अनुसरणे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

प्रतिबंधात्मक उपाय:

• कोणताही शारीरिक व्यायाम सुरू करण्याअगोदर पुरेसे वॉर्मिंग अप करणे. लवचिकता वाढवण्यासाठी स्ट्रेचिंग करा. ज्या-त्या खेळासाठी आवश्यक ती गियर्स आणि योग्य ते शूज वापरा. स्नायू आणि लिगामेन्ट यांच्यावर अनपेक्षित ताण येऊ नये, यासाठी व्यायामाची तीव्रता हळूहळू वाढवा.

• टेंडन्सना पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ देण्यासाठी व्यायामाच्या समयसारणीत विश्रांतीचे दिवस ठेवा. व्यायामची खूप जास्त पुनरावृत्ती आणि जादा व्यायाम करण्याबाबत काळजी घ्या. व्यायाम करताना योग्य फॉर्म आणि तंत्र वापरा. व्यायामाची वेळ आणि तीव्रता वाढवताना हळूहळू वाढवा जेणेकरून टेंडन्सवर जास्त ताण येणार नाही.

• व्यायाम करताना हायड्रेटेड राहण्यासाठी व्यायामाच्या आधी, व्यायाम करताना आणि त्यानंतर भरपूर पाणी प्या. स्नायूंची कार्यक्षमता योग्य ठेवण्यासाठी आहारातून इलेक्ट्रॉलाइट्स घ्या किंवा इलेक्ट्रॉलाइट्स युक्त स्पोर्ट्स ड्रिंकचा वापर करा. स्नायूंची लवचिकता वाढवण्यासाठी आणि पेटके येण्याची शक्यता कमी करण्यासाठी नियमित स्ट्रेचिंग करा. खेळाडू म्हणून तुम्ही जादा व्यायाम करत असाल, तर हळूहळू व्यायामाचे प्रमाण वाढवा ज्यामुळे तुमचे स्नायू अनुकूल होत जातील.

• संतुलित आणि कॅल्शियम व व्हिटामीन D युक्त आहार घेऊन हाडे मजबूत बनवा. नाजुक भागांसाठी गार्ड्स, ब्रेसेस किंवा पॅडिंग सारखी सुरक्षा उपकरणे वापरा. ज्या-त्या खेळाचे नियम पाळा आणि सुरक्षेबाबतची खबरदारी घ्या. टक्कर होण्याचे, धडपडण्याचे टाळण्यासाठी धोकादायक परिस्थितीपासून दूर रहा आणि सभोवतालच्या परिस्थितीकडे नीट लक्ष द्या.

• इजा होण्याची शक्यता कमी करण्यासाठी, व्यायाम करताना योग्य फॉर्म (मुद्रा) आणि टेकनिक वापरा. व्यायाम केल्यानंतर स्नायू आखडू नयेत किंवा दुखू नयेत यासाठी सौम्य, दीर्घ स्ट्रेचिस सह कुल डाऊन करणे गरजेचे आहे.

• तुमच्या सामान्य आरोग्यासाठी आणि काही समस्या असल्यास आधीच त्याचा छडा लावण्यासाठी डॉक्टरकडे जाऊन नियमित तपासण्या करा. व्यायाम करताना ही पथ्ये सांभाळल्यास क्रीडा-संबंधी दुखापत होण्याचा धोका कमी करणे आणि परफॉर्मन्स सुधारणे शक्य आहे.

प्रशिक्षणाच्या योग्य टेकनिक वापरुन, व्यायामाची तीव्रता हळूहळू वाढवून, चांगल्या फॉर्म (मुद्रा)वर भर देऊन, व्यायामानंतर योग्य प्रकारे कूल डाऊन करून, रिकव्हरीसाठी पुरेसा वेळ देऊन आणि नियमितपणे वैद्यकीय तपासण्या करून घेऊन खेळाडू क्रीडा-संबंधी इजा त्यांना होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करू शकतात. असे केल्याने त्यांचा एकंदर परफॉर्मन्स सुधारेल आणि पुढे जाता आरोग्य देखील चांगले राहील.

महत्वाच्या बातम्या :

लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर, पुण्यात धंगेकर तर कोल्हापूरातून या नावाला पसंती

LokSabha Election 2024 | ‘अजितदादा जे बोलले ते पवारसाहेबांचा अभिमान टिकवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी होते’

Jitendra Awad | माझ्या डोळ्यात साहेबांसंदर्भात आदर आणि प्रेम असल्याने मनातून अश्रू येतात