Pune News | ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024’चे आयोजन – पालक व विद्यार्थ्यांसाठी प्रवेश विनामूल्य

Pune News | परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्टडी स्मार्ट’च्या वतीने ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 13 एप्रिल 2024 रोजी दि पोच हॉल, बोट क्लब, पुणे येथे सकाळी 11.00 ते संध्याकाळी 5.00 यावेळेत ‘ग्लोबल एड्युकेशन फेअर 2024’ भरवण्यात येणार आहे. येथे पालक व विद्यार्थ्यांसाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे, अशी माहिती ‘स्टडी स्मार्ट’ चे मॅनेजिंग डायरेक्टर चेतन जैन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पुणे (Pune News) श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना चेतन जैन म्हणाले, 12 वी नंतर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची इच्छा असते. पण त्यासाठी परदेशातील कोणत्या विद्यापीठात कोणत्या संधी उपलब्ध आहेत? त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया काय आणि कशी असते? परदेशात जायचं म्हटलं की तेथील राहण्याची सोय कशी होणार ? यासाठी लागणारा पैसा कसा उपलब्ध होईल? असे अनेक प्रश्न पडतात. या पार्श्वभूमीवर ‘स्टडी स्मार्ट’च्या वतीने आयोजित ‘ग्लोबल एड्युकेशन फेअर 2024’ मध्ये एकाच छताखाली या सगळ्या शंकांचे निरसन होणार आहे. यामध्ये इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई येथील जवळपास 40 हून अधिक टॉप विद्यापीठाच्या प्रतिनिधींशी चर्चा करता येणार आहे. तसेच येथील अभ्यासक्रम व करीयरच्या संधी जाणून घेता येणार आहेत.

या शिवाय परदेशात शिक्षणासाठी कोणकोणत्या शिष्यवृत्ती आहेत यांची माहिती देखील मिळणार आहे. तसेच या सर्वांसाठी आवश्यक असणारे अर्थसाहाय्य कशा प्रकारे उपलब्ध होईल? याविषयी विनामूल्य मार्गदर्शन देखील या ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024’ मध्ये विद्यार्थी व पालकांना मिळणार असल्याचे जैन यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; पहा कुणाला मिळाली संधी

Ravindra Dhangekar | आघाडीत बिघाडी : पुण्यात शिवसेना उबाठाचा रविंद्र धंगेकरांच्या प्रचाराला ‘जय महाराष्ट्र’

Nana Patole Accident: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भीषण अपघात, गाडीचा चुराडा