Pune News | विद्यार्थ्यांना एकाच छताखाली मिळाल्या परदेशी शिक्षणाच्या अनेक संधी

Pune News | परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024’मध्ये एकाच छताखाली अनेक संधी व पर्याय उपलब्ध झाल्या. ‘स्टडी स्मार्ट’च्या वतीने ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024’चे आयोजन करण्यात आले. यामध्ये इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई येथील जवळपास 40 हून अधिक सर्वोत्तम विद्यापीठाच्या प्रतिनिधींशी चर्चा करता आल्याने विद्यार्थ्यांनी येथे मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. विद्यार्थी आणि पालकांना याठिकाणी निशुल्क मार्गदशन मिळाले.

12 वी बोर्डाच्या परीक्षा मागील महिन्यात  संपल्या असून पदवी परीक्षा देखील संपत आल्या आहेत. या टप्प्यावर अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्याची इच्छा असते. मात्र कोठे योग्य संधी उपलब्ध आहेत? एज्युकेशन लोन कसे मिळू शकते का? परदेशी जाण्यासाठी कोणत्या स्कॉलरशिप असतात? हे सगळे प्रश्न विद्यार्थ्या सोबत त्यांच्या पालकांना देखील पडतात. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘स्टडी स्मार्ट’च्या वतीने  ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024’ भरवण्यात आले आहे. या फेयरचे हे 14 वे वर्ष आहे.

(Pune News) यावेळी ‘स्टडी स्मार्ट’च्या नवीन संकेतस्थळाचे आणि  लोगोचे अनावरण ‘स्टडी स्मार्ट’चे संचालक चेतन जैन यांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी

Sunetra Pawar: शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ असा उल्लेख केल्याने सुनेत्राताईंना अश्रू अनावर, म्हणाल्या….

Sunil Tatkare | २०१९ पेक्षा जास्त मतदान या निवडणुकीत माझ्या अल्पसंख्याक समाजाकडून मिळेल