Ram Temple Ayodhya: बॉलीवूडच्या ३ खान पैकी कुणालाही मिळाले नाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण

Ram Lalla Pran Pratishtha: ज्या दिवसाची लोक वर्षानुवर्षे वाट पाहत होते तो दिवस आज आला आहे. अयोध्येतील राम मंदिरात आज अभिषेक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेक बडे लोक येत आहेत तर काही आधीच पोहोचले आहेत. राजकारण्यांपासून ते बॉलीवूड स्टार्सपर्यंत सर्वांनाच राम मंदिराच्या अभिषेकाचे साक्षीदार व्हायचे आहे. पण असे काही बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ज्यांना राम मंदिर प्राण प्रतिष्ठाचा भाग होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले नाही. शाहरुख खानपासून (Shahrukh Khan) ते दीपिका पदुकोणपर्यंत असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांना निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही.

अमिताभ बच्चन, रजनीकांत, रणबीर कपूर, आलिया भट्ट, कतरिना कैफसह अनेक कलाकार अयोध्येला पोहोचणार आहेत आणि काही स्टार्स २१ जानेवारीलाच तिथे पोहोचले होते. या सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता आम्‍ही तुम्‍हाला अशा सेलेब्सची नावे सांगत आहोत ज्यांना निमंत्रण मिळालेले नाही.

शिवाजी मानकर

ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, शाहरुख खानला निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही. हे निमंत्रण न पाठवण्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सलमान खान देखील सहभागी होऊ शकणार नाही. कारण त्यालाही निमंत्रित करण्यात आलेले नाही. सलमान खानशिवाय आमिर खानलाही निमंत्रित करण्यात आलेले नाही.

बॉलीवूडचे सर्वात रोमँटिक कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनाही आमंत्रित करण्यात आलेले नाही. दीपिका-रणवीरसोबत सैफ अली खान आणि करीना कपूरही यात सहभागी होणार नाहीत.

महत्वाच्या बातम्या-

Ram Mandir Ayodhya : संपूर्ण पुणे शहर बनले राममय; धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचं आयोजन

Ram Mandir Ayodhya : रामाने रावणाचा नि:पात करण्याचा निश्चय केला त्या मंदिरात मोदींनी केली महापूजा

Santosh Shelar | माओवाद्यांशी संबंधित पुण्यातील बेपत्ता संतोष शेलार परतला; रुग्णालयात दाखल

आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं हीच प्रभू श्रीरामाची खरी पूजा; सावित्रीच्या लेकींनी नाकारली प्राणप्रतिष्ठेची सुट्टी