रामनवमी आणि हनुमान जयंती राज्यात दंगली घडवण्यासाठीच आहेत; जितेंद्र आव्हाडांचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा

मुंबई- रामनवमीच्या (Ramnavami) दिवशी औरंगाबादमध्ये दंगल झाली. त्यानंतर रामनवमी आणि हनुमान जयंती (Hanuman Jayanti) राज्यात दंगली घडवण्यासाठीच आहे की काय, असं वाटायला लागलं आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले आहे.शुक्रवारी (२१ एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात घमासान सुरू झाले आहे.

“रामनवमीच्या दिवशी औरंगाबादमध्ये दंगल झाली. त्यानंतर रामनवमी आणि हनुमान जयंती राज्यात दंगली घडवण्यासाठीच आहे की काय, असं वाटायला लागलं आहे. खरं तर येणारं वर्ष हे जातीय दंगलींचं वर्ष असेल कारण सत्ताधारी देशातील युवकांना नोकऱ्या देऊ शकत नाहीत. महागाई कमी करू शकत नाहीत, त्यामुळे सत्ताधाऱ्याकडे धार्मिक सोहळे करून मत मिळवल्याशिवाय पर्याय नाही”, असे यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.