Rishabh Pant | टी20 विश्वचषकापूर्वी ऋषभ पंत ऍक्शनमध्ये? 15 महिन्यांनंतर आयपीएलमध्ये खेळताना दिसणार

टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) पुनरागमनाबाबत एक मोठे अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसू शकतो. तो 17 व्या सीझनमध्ये सुमारे 15 महिन्यांनंतर ॲक्शनमध्ये परत येईल. मात्र मैदानावर पंत फक्त फलंदाजी करताना दिसू शकतो. विकेटकीपिंगची जबाबदारी दुसऱ्या खेळाडूवर सोपवली जाऊ शकते. मात्र, अद्याप याबाबत टीमकडून कोणतेही अधिकृत अपडेट आलेले नाही.

दुखापतीमुळे टीम इंडियापासून दूर असलेला पंत (Rishabh Pant) नुकताच बेंगळुरूजवळील अलूर येथे सराव सामन्यात खेळताना दिसला. हा त्याचा पहिला सराव सामना होता. सध्या, तो बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. जर तो आयपीएल मध्ये पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला तर तो 2024 च्या टी-20 विश्वचषकातही खेळताना दिसू शकतो.

कार अपघातात पंत थोडक्यात बचावले होते
30 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या कार अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. त्याच्या कारला आग लागली होती. या अपघातात पंतच्या उजव्या गुडघ्याच्या लिगामेंटला आणि उजव्या हाताच्या मनगटावर, घोट्याला आणि पाठीला दुखापत झाली होती. त्याच्या चेहऱ्यावरील जखमा आणि ओरखडे दुरुस्त करण्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. नुकताच पंत उपचारासाठी लंडनलाही गेला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो अनेकदा चाहत्यांना त्याच्या तब्येतीत झालेल्या सुधारणांची माहिती देत ​​असतो.

22 मार्चपासून आयपीएल सुरू होणार आहे
आयपीएल 2024, 22 मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी मंगळवारी पीटीआय या वृत्तसंस्थेला याची पुष्टी दिली. सार्वत्रिक निवडणुका असूनही, संपूर्ण स्पर्धा भारतातच खेळवली जाईल. एप्रिल आणि मे मध्ये निवडणुका होणे अपेक्षित आहे आणि हेच मुख्य कारण आहे की आयपीएलच्या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नाही. धुमाळ म्हणाले की, सुरुवातीला फक्त पहिल्या 15 दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित सामन्यांची यादी निश्चित केली जाईल.

महत्वाच्या बातम्या-

Jayant Patil भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

भाजपसोबत युती करणार का?; आशिष शेलार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय म्हणाले?

मनसे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीसह जाणार? आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, तासभर चर्चा