Saba Azad: ‘तुम्ही किती घाणेरड्यासारखे वागता’ ह्रतिकची गर्लफ्रेंड एवढी का चिडली?

Saba Azad: बॉलीवूडचा डॅशिंग अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) याची गर्लफ्रेंड (Hritik Roshan’s Girlfriend) सबा आझाद ही तिच्या आगामी वेब सीरिज Who’s your Gynac मुळे चर्चेत आहे. यादरम्यान सबाने तिला सतत सोशल मीडियावरुन केले जाणारे ट्रोल आणि तिचा पापाराझ्झींकडून होणाऱ्या त्रासावर जोरदार टीका केली आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सबा म्हणाली की, माझ्या आणि ह्रतिकच्या अफेयरविषयी नेटकऱ्यांना आणि पापाराझ्झींना कळले तेव्हा त्यांनी माझ्या घराबाहेर गर्दी केली होती. ते सतत माझा फोटो घेण्यासाठी उत्सुक असायचे. मला माझी प्रायव्हसी नावाची कोणतीच गोष्ट राहिली नव्हती. सतत सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि त्यामुळे नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जाणे हे नित्याचे झाले होते. माझे त्यांना सांगणे आहे की, मी काय दगडाची बनलेली आहे का, मला त्रास होत नाही का.

पापाराझ्झी कसे वागतात आणि किती मानसिक त्रास देतात याविषयी बोलायलाच नको. कारण त्यांना आपण टाळू शकत नाही. त्यांनाही आपण एखाद्या सेलिब्रेटीला किती त्रास द्यावा त्याचा किती पाठलाग करावा हेही कळत नाही. हा किती घाणेरडापणा आहे हे कुणालाच कसं कळत नाही असा रोखठोक प्रश्न देखील सबानं यावेळी केला आहे. जेव्हापासून मी ह्रतिकची गर्लफ्रेंड आहे त्यांना कळले तेव्हापासून मला खूपच वेगवेगळ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं आहे.