Sunil Tatkare | सुनील तटकरे रायगडमधून लोकसभा निवडणूक लढवणार,अजित पवार यांची घोषणा

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्या उमेदवारीची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुणे येथे केली. महायुतीला महाराष्ट्रात ४८ जागा लढवायच्या असून सर्व जागांचे उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची माहितीही यावेळी अजित पवार यांनी दिली.

अजित पवार म्हणाले, आमची आमदारांची बैठक झाली. आम्ही एकत्र चर्चा करुन महायुतीच्या ४८ जागांबद्दल महाराष्ट्रात कुणी कुठे जागा लढवायच्या त्याचं ८० टक्के काम झालं आहे. आता मी सांगतो की ९९ टक्के जागावाटपाचं काम फायनल झालं आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी उमेदवार दिले आहेत. आज मी पहिली जागा जाहीर करतो आहे. रायगड लोकसभा मतदार संघातून सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे महायुतीचे उमेदवार म्हणून लोकसभा लढवतील ही माहिती अजित पवार यांनी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune LokSabha 2024 | फडणवीसांच्या भेटीनंतर चक्रे फिरली; मुळीक बंधू लागले मोहोळांच्या प्रचाराला !

Pune News | पाटलांना फडणवीसांची तंबी? विधानसभेचे बघू, आधी लोकसभा उमेदवाराचा प्रचार करण्याचे निर्देश

 वरुण गांधी यांचे तिकीट कापले; भाजपचा धाडसी निर्णय