खासदार,आमदार आणि लोकप्रतिनिधी हे देशासाठी कलंक आहेत : संभाजी भिडे

सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. यावेळी सुद्धा त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत. खासदार,आमदार आणि लोकप्रतिनिधी हे देशासाठी कलंक आहेत,अशा शब्दात संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राजकीय पक्षाच्या नेत्यांवर जहरी टीका केली आहे. तसेच सर्वधर्म हा गांडुळ विचार असून तो इतिहासाला धरून नसल्याचे मतही भिडे यांनी व्यक्त केले.

ते बुधवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता दौड समारोप प्रसंगी ते बोलत होते. (Sambhaji Bhide speech in Sangli). ते म्हणाले, सर्वधर्म हा गांडूळ विचार आहे, हा सत्य विचार नसून असत्य विचार आहे,हा इतिहासाला धरून विचार नाही,असे मत व्यक्त करत आपल्या मातृभूमीसाठी जगणारी माणसं पाहीजे आहेत,पण इथेचं बोंब आहे.साधी गोष्ट घ्या,लोक निवडून देतात ,ते आमचे खासदार काय ? आमदार काय, लोकप्रतिनिधी काय ? शरम वाटत नाही. सगळेजण पगार घेतात,भाडोत्री. हे बेकार असून आपल्या लोकशाहीला आणि परंपरेला कलंक आहेत,अशा शब्दांत भिडे गुरुजी यांनी टीका केली.