हिवाळ्यात सूर्यप्रकाशाच्या कमतरेमुळे तुटू शकतात हाडे, Vitamin Dची कमी पूर्ण करा ‘या’ पदार्थांतून

व्हिटॅमिन डीचा (Vitamin D) पुरवठा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीरातील कॅल्शियमचे (Calcium) शोषण कमी होऊ शकते, ज्यामुळे मजबूत हाडे देखील हळूहळू कमकुवत होऊ शकतात आणि तुटू शकतात. एवढेच नाही तर रक्तपेशी आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी व्हिटॅमिन डी देखील आवश्यक आहे. व्हिटॅमिन डीचा बहुतांश पुरवठा आपल्या त्वचेवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशातून (Sunlight) होतो. पण तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून त्याची कमतरता भरून काढू शकता. येथे आम्ही तुम्हाला व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे ते सांगत ( Vitamin D Rich Foods) आहोत.

दररोज शरीराला किती व्हिटॅमिन डी आवश्यक 
WebMD नुसार, नवजात आणि मुलांना दररोज 10 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. तर प्रौढ व्यक्तीला 15 मायक्रोग्रॅमची गरज असते. ज्या लोकांचे वय ७० वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांना दररोज सुमारे २० मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते.

व्हिटॅमिन डी समृद्ध अन्न
संत्री- संत्री (Orange) किंवा संत्र्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. रोज एक ग्लास ताज्या संत्र्याचा रस प्यायल्यास उत्तम. त्यात इतर अनेक पौष्टिक घटक देखील असतात, जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात.

सॅल्मन- जर तुम्ही दररोज 3 आउंस सॅल्मन (Salmon) खाल्ले तर ते 10 ते 18 एमसीजी व्हिटॅमिन डी पुरवते. याशिवाय ओमेगा ३ फॅटी अॅसिड असलेल्या माशांमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात आढळते.

अंडी- इतर पोषक तत्वांव्यतिरिक्त अंड्यांमध्ये (Eggs) व्हिटॅमिन डी देखील आढळते. विशेषतः अंड्याच्या पिवळ्या भागात. याचा समावेश तुम्ही रोजच्या आहारात करू शकता.

मशरूम- मशरूममध्ये (Mashroom) नैसर्गिक जीवनसत्व डी देखील आढळते. मशरुम खाण्यापूर्वी 1 तास सूर्यप्रकाशात ठेवल्यास व्हिटॅमिन डीची पातळी खूप वाढते.

दही- जर तुम्ही रोज दही (Yoghurt) खात असाल तर त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी देखील असते, ज्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डीचा पुरवठा होतो. यासाठी ताजे दही खावे. कमी चरबीयुक्त दही वापरल्यास चांगले होईल.

दूध- एक कप दुधात (Milk) 3 एमसीजी व्हिटॅमिन डी आढळते.

सप्लिमेंट घ्या- जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर तुम्ही डॉक्टरांशी व्हिटॅमिन डी सप्लिमेंटबद्दल बोलले पाहिजे. तुम्ही ते औषधाप्रमाणे रोज घेऊ शकता.