राऊत ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत ? कोणत्या पक्षात प्रवेश करणार? कुणी केला गौप्यस्फोट?

Mumbai – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत हा दावा केल्याने या चर्चा सुरु झाल्या असून राऊत यांनी साथ सोडली तर तो ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

या पत्रकार परिषदेत राणे म्हणाले, येणाऱ्या आठवड्यात राज्यात भूकंप होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हा भूकंप होणार आहे. 10 जूनच्या आधी किंवा राष्ट्रवादीच्या वर्धापण दिनी संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी त्यांच्या बैठका झाल्या आहेत. बोलणी झाली आहे. मला ही माहिती सूत्रांनी दिली. संजय राऊत यांच्या गेल्या काही दिवसातील भूमिका पाहा. शरद पवारांच्या राजीनामा आणि नंतरची राऊत यांची भूमिका पाहा. त्यातून तुम्हाला सर्व अर्थ लागतील, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.