Santosh Shinde | यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे – प्रा. संतोष शिंदे यांचं प्रतिपादन

Santosh Shinde  | “स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे.कारण यशवंतराव हे महाराष्ट्राचं वैचारिक अधिष्ठान आहेतं.त्यांच्या विचाराला आपण विसरलो आहोत.आजची राजकीय परिस्थीती पाहता हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण यांचाच महाराष्ट्र आहे का ? असा प्रश्न देखील निर्माण होतो असं मत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते,प्रा. संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी बोलताना व्यक्त केले.

पर्वती पायथा येथील शाहू कॉलेज परिसरातील यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयातील यशवंतरावांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाहू कॉलेजचे प्राचार्य विलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रकाश जोशी,जिल्हा प्रशासकीय अधिकारी यांची देखील उपस्थिती होती.

प्रसंगी बोलताना प्रा.शिंदे म्हणाले की “यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला एक वैचारिक दिशा देण्याचं काम केलंय आणि म्हणूनच महाराष्ट्र समाजकारण,राजकारण या क्षेत्रात कायम अग्रेसर राहिला आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात देखील यशवंतरावांच्या विचाराला जाते कारण राजकारणात समाजकारणात तुमचे मतभेत असू शकतात पण मनभेद नसावेत हे यशवंतरावांनी आपल्याला शिकवलं आहे.तसचं आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र कृष्णाकाठ देखील जरूर नजरेखालून घालावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.

प्रसंगी संस्थेच्या प्रमुख प्रमिलाताई गायकवाड,प्रा.रविंद्र वाकडे,प्रा.संजय शिरसाठ,प्रा. माधुरी शिर्लेकर, प्रा.सोनल पांढरे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

CAA Act | भारताचा CAA कायदा काय आहे? ज्याबाबत मोदी सरकारने अधिसूचना जारी केली, वाचा सर्वकाही

Pankaja Munde | पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको

Ajit Pawar | पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य