Uddhav Thackeray | CAA बाबत तुमची भूमिका काय? इथे ही यू-टर्न घेणार? भाजपचा ठाकरे गटाला खोचक सवाल

Uddhav Thackeray On CAA | केंद्रातील मोदी सरकार ने (Modi Govt) नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अधिसूचना जारी केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचे (Central Govt) हे मोठे पाऊल आहे. याअंतर्गत तीन शेजारी देशांतील अल्पसंख्याकांना आता भारतीय नागरिकत्व मिळू शकणार आहे. यासाठी त्यांना केंद्र सरकारने तयार केलेल्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर शिवसेना ठाकरे गटाने हा निवडणुकीचा जुमला असल्याचे टीका केली. यावरुन आता भाजप नेते आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) तोंडावर मोदी सरकारने निवडणूक जुमल्याची चाल खेळली आहे. देशात नागरिकत्व सुधारणा अर्थात सीएए कायदा लागू करण्याचा वटहुकूम भाजप सरकारने आज अचानक जारी केला असून मध्यरात्रीपासूनच हा कायदा लागू झाला आहे. अशी टीका शिवसेनेच्या सामना अग्रलेखामध्ये करण्यात आली होती.

आता उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देताना आशिष शेलार म्हणाले, आघाडी करुन मुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्लीत गेले तेव्हापर्यंत उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर (सीएए) केंद्र सरकारचे समर्थन केले होते. आज दै. सामनाने “हा निवडणूक जुमला” असे संबोधून पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू यांची नकारघंटेची भूमिका ठळकपणे अधोरेखित केलेय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

तसेच भूमिकांमध्ये “यु-टर्न फेम” उबाठा गठाला आमचा थेट सवाल आहे..सीएए (CAA) बाबत तुमची भूमिका काय? शरणागती हिंदूना तुमचा विरोध आहे का? इथे ही यु-टर्न घेणार की काय? असा थेट सवाल आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

CAA Act | भारताचा CAA कायदा काय आहे? ज्याबाबत मोदी सरकारने अधिसूचना जारी केली, वाचा सर्वकाही

Pankaja Munde | पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको

Ajit Pawar | पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य