Sharad Pawar | ईडी हा भाजपाचा सहकारी पक्ष,देशातील यंत्रणांचा सत्ताधाऱ्यांकडून गैरवापर सुरू

Sharad Pawar | ईडी हा भाजपाचा सहकारी पक्ष असून त्यांच्यामार्फत विरोधकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम सुरू आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमधून केला आहे.

पवार म्हणाले की, या देशातील केंद्रीय यंत्रणांचा वापर निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या लोकांसाठी यापूर्वी फारसा कधी झाला नाही. सध्याच्या घडीला ईडी, सीबीआय इतर एजन्सींचा ठिकठिकाणी गैरवापर केला जात आहे. कर्नाटकमध्ये एका वरिष्ठ मंत्र्यावर कारवाई झाली. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्याला अटक करण्यात आली. डी. के. शिवकुमार यांना न्यायालयाने निर्दोष सोडले. एखाद्या राज्यातला इतका वरिष्ठ नेता त्याला अटक करणे, कोर्टाने त्याला सोडणे याचा अर्थ स्वच्छ आहे की ईडीचा गैरवापर केला जात आहे. असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातही या सगळ्याचा वापर सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख यांनी एका संस्थेला  १०० कोटी रुपये दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यासाठी त्यांना अटकही झाली. आता असे दिसत आहे की चार्जशीटमध्ये ती रक्कम १ कोटी आहे. तसेच ती देणगी आहे. तरीही देशमुख यांना त्यात अडकवण्यात आले. आता न्यायालयाचा निर्णय काय लागेल ते पाहणे आवश्यक आहे. एक प्रकारची दहशत निर्माण केली जाते आहे असे पवार म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

CAA Act | भारताचा CAA कायदा काय आहे? ज्याबाबत मोदी सरकारने अधिसूचना जारी केली, वाचा सर्वकाही

Pankaja Munde | पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको

Ajit Pawar | पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य