Shivajirao Adhalarao Patil | “अमोल कोल्हे राजकारणातील दुसरे संजय राऊत”, आढळरावांनी कोल्हेंना डिवचलं

Shivajirao Adhalarao Patil vs Amol Kolhe | लोकसभा निवडणुकीची तारिख जसजशी जवळ येत आहे, तसे प्रतिस्पर्धींमधील टीका टिप्पणींनीही जोर धरला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक होतांना दिसत आहे. अशातच एका पत्रकार परिषदेत आढळरावांनी संजय राऊतांचा उल्लेख करत अमोल कोल्हे यांची चांगलीच फिरकी घेतली आहे.

शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांची केवळ बडबड आणि घोषणाबाजी सुरू आहे. ते राजकारणातील दुसरे संजय राऊत आहेत. अशी टिका आढळरावांनी कोल्हेंवर केलीय. यातच मागील पाच वर्षात अमोल कोल्हे यांनी शिरूर मतदारसंघात काय कामं केलीत ते त्यांनी दाखवावे ? असं म्हणत आढळरावांनी थेट अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिलंय.

यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, शिरूरच्या विद्यमान खासदारांनी पाच वर्षात काहीच काम केले नाही. मात्र, त्यानंतरही त्यांची बडबड आणि पोपटपंची सुरू आहे. अजित पवार काही बोलले, की त्यांची वचवच सुरू होते. कोल्हे यांची केवळ बडबड आणि घोषणाबाजी सुरू आहे. निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांना पाच वर्षात काय काम केले. हे दाखविता येत नाही. असा टोलाही त्यांनी लगावला.

तर मी खासदार असताना केलेल्या कामांची उद्घाटने कोल्हे करीत आहेत. पाच वर्षात ते मतदारसंघात फिरकले नाहीत. मात्र त्यानंतरही निवडणुक लढविताना त्यांना लाज वाटत नाही. अशी टिका देखील त्यांनी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | भावनिक न होता देशाच्या भवितव्यासाठी महायुतीला मतदान करा; माजी सैनिकांच्या मेळाव्यात अजित पवारांचे आवाहन

Shivajirao Adhalrao Patil | “जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना

Ravindra Dhangekar | पुण्याच्या विकासापेक्षा धंगेकरांसाठी टिका टिपण्णी महत्त्वाची; व्हिजनच्या नावानेही बोंबाबोंब