Shoaib Akhtar | वयाच्या 48व्या वर्षी तिसऱ्यांदा वडील बनला शोएब अख्तर, माजी पाकिस्तानी गोलंदाजाने शेअर केला लेकीचा फोटो

पाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि त्याची पत्नी रुबाब खान (Rubab Khan) तिसऱ्यांदा पालक बनले आहेत. त्यांच्या मुलीचा जन्म 1 मार्च रोजी झाला, जिचे नाव दोघांनी नूरेह अली अख्तर ठेवले आहे. अख्तर हा आधीच दोन मुलांचा बाप आहेत. त्याच्या मोठ्या मुलाचे नाव मोहम्मद मिकेल अली आणि लहान मुलाचे नाव मोहम्मद मुजद्दीद अली आहे, त्यांचा जन्म अनुक्रमे 2016 आणि 2019 मध्ये झाला होता.

वयाच्या 48व्या वर्षी आपल्या तिसऱ्या मुलीचे जगात स्वागत केल्यानंतर, अख्तरने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर चाहत्यांसह ही बातमी शेअर केली आणि आपल्या मुलीसाठी सर्वांचे आशीर्वाद आणि प्रार्थना मागितल्या.

शुक्रवारी, उजव्या हाताच्या माजी वेगवान गोलंदाजाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये तो आपल्या मुलीला आपल्या मांडीवर घेतलेला दिसतो आहे. त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, मिकाईल आणि मुजद्दीद यांना आता एक लहान बहीण आहे. अल्लाह तालाने आम्हाला मुलगी दिली आहे. 1 मार्च 2024, 19 शाबान, 1445 हिजरी रोजी जुम्माच्या नमाजच्या वेळी जन्मलेल्या नूरह अली अख्तरचे स्वागत. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांची विनंती.

उल्लेखनीय आहे की शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) 2014 मध्ये रुबाब खानसोबत खैबर पख्तुनख्वा प्रांतातील हरिपूर येथे कुटुंबीयांच्या उपस्थितीत विवाह केला होता. त्यावेळी अख्तरच्या लग्नाची खूप चर्चा झाली कारण त्याची पत्नी 20 वर्षांची होती आणि माजी पाकिस्तानी गोलंदाज 38 वर्षांचा होता.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’