अजब करण देत पाकिस्तान सरकारने केले लोकांना कमी चहा पिण्याचे आवाहन

कराची – आर्थिक संकटाचा (Economic crisis) सामना करणाऱ्या पाकिस्तानची (Pakistan) स्थिती कोणापासूनही लपलेली नाही. पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी पाकिस्तान सरकारने आता देशातील नागरिकांना चहाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना हे विचित्र आवाहन अन्य कोणीही नाही तर पाकिस्तानचे नियोजन आणि विकास मंत्री अहसान इक्बाल (Planning and Development Minister Ahsan Iqbal) यांनी केले आहे. अहसान इक्बाल यांनी पाकिस्तानी नागरिकांना चहाचे सेवन कमी (Reduce tea intake) करण्याचे आवाहन केले आहे.

यामागे युक्तिवाद करताना ते म्हणाले की, या पाऊलामुळे सरकारला आयात खर्च कमी करण्यास मदत होईल. पाकिस्तानी मंत्री म्हणाले की, सरकार कर्ज घेऊन चहा आयात करते. त्यामुळे चहाच्या आयातीवर होणारा खर्च कमी व्हावा, अशी सरकारची इच्छा आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, मंगळवारी राजधानी इस्लामाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अहसान इक्बाल म्हणाले, “मी देशातील लोकांना आवाहन करतो की, चहाचा वापर दररोज एक किंवा दोन कपांनी कमी करावा. कारण आम्ही चहा आयात करण्यासाठी पैसेही घेतो.

पाकिस्तानच्या या वाईट स्थितीसाठी अहसान इक्बाल यांनी मागील सरकारला जबाबदार धरले. इम्रान खान सरकार (Government of Imran Khan) देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त (The economy collapsed) करत असल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वीज बचत करण्याचे आवाहन त्यांनी उद्योजकांना केले. त्यांनी दुकानदारांना रात्री 8.30 पर्यंत बाजार बंद करण्यास सांगितले.

आर्थिक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाकिस्तान सरकारने गेल्या महिन्यात दोन महिन्यांसाठी ४१ वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली होती. पण या निर्बंधांचा काही विशेष परिणाम झालेला दिसत नाही. पाकिस्तानच्या आयात बंदीमुळे आयात बिलात केवळ $600 दशलक्षची घट झाली आहे, जी एकूण आयात खर्चाच्या केवळ 5 टक्के आहे.