Karmala Market Committee Election : पाटील गटाकडून 51 उमेदवारांनी केले नामांकन अर्ज दाखल

Karmala Market Committee Election – करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पाटील गटाकडून 51 उमेदवारानी नामांकन अर्ज दाखल केल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर (Sunil Talekar) यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना तळेकर यांनी सांगितले की माजी आमदार नारायण पाटील (Former MLA Narayan Patil) यांच्या नेतृत्वावर करमाळा तालुक्यातील जनतेचा विश्वास टिकून राहिला असून तालुका अंतर्गत निवडणुकांमध्ये जनतेने पाटील गटास भरभरून आशीर्वाद दिले आहेत. यामुळे बाजार समितीच्या या निवडणूकीत पाटील गटाचा विजय निश्चित आहे. पाटील गटाची स्पर्धा विद्यमान आमदार संजयमामा शिंदे (MLA Sanjaymama Shinde) यांचेशी असून इतर गटा बरोबर टोकाचे मतभेद नाहीत. आमदार संजय मामा शिंदे यांच्या निष्क्रियतेमुळे गेली चार वर्ष झाली करमाळा तालुक्यातील विकास कामे ठप्प असून बाजार समितीच्या निवडणूकीत जनता याबद्दल निश्चितच मतपेटीतून आपली प्रतिक्रिया व्यक्त करणार.

पाटील गटाकडून या निवडणुकीसाठीच्या बाबतीत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार माजी आमदार नारायण पाटील यांना असून त्यांच्या आदेशानुसार या निवडणुकीतील विजयासाठी पाटील गटाचे कार्यकर्ते तयार असल्याचेही सांगत विजया बद्दलची खात्री तळेकर यांनी बोलून दाखवली.

या निवडणुकीत पाटील गटाकडून आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक नवनाथ झोळ, पाटील गटाचे युवानेते पृथ्वीराज पाटील, केमचे सरपंच अजितदादा तळेकर, युवानेते पृथ्वीराज राजेभोसले, बाजार समिती माजी संचालक देवानंद बागल, माजी सभापती बापूसाहेब पाटील, नंदाताई हरिदास केवारे,सरपंच डॉ.अमोल घाडगे, जोतिराम नरुटे, दत्तात्रय गव्हाणे, सचिन राऊत, विजयसिंह नवले, बहुजन सेनेचे नेते राजाभाऊ कदम, बाळु पवार , संदीप मारकड, सरपंच राम हरी कुदळे, नितीन हिवरे, रामेश्वर तळेकर, हनुमंत आवटे, किरण पाटील, ग्रा प सदस्य संजय तोरमल, विलास कोकने, महेश पाटील, राहुल गोडगे, विशाल केवारे,अशोक शेळके, वैभव पाटील, छगन शिंदे, बापू लोखंडे, युवराज मेरगल, शिवाजी सरडे, रियाज मुल्ला, धनु शिरस्कर, आनंद अभंग, जयराम सोरटे, रावसाहेब शिंदे,अप्पा चौगुले, मनीषा कांबळे,यासह अनेक पदाधिकारी या निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी बुमराह परतला, ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह भारत देणार तगडे आव्हान

राजकारणात अस्पृश्यता पाळत असल्याची घणाघाती टीका! आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल

ग्रामविकास विभागाच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये – मंत्री गिरीश महाजन