दुःखद! ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन, 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune – ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. वृध्दापकाळाने त्यांचे निधन झाल्याच माहिती त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी दिली आहे. लावणी आणि सुलोचना ताईंचे वेगळेच नाते होते. मराठी चित्रपटसृष्टीत ठसकेबाज लावणी गात त्यांनी एक वेगळीच भूरळ श्रोत्यांना घातली होती. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सुलोचना चव्हाण यांचे आज दुपारी 12 च्या सुमारास फणसवाडी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.  वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.  सुलोचना चव्हाण यांना भारत सरकारने पद्मश्री देऊन  सन्मान केला होता.