Suryakumar Yadav | टी20 क्रिकेटचा किंग परतला, सूर्यकुमारने आरसीबीविरुद्ध फक्त 17 चेंडूत ठोकले सर्वात वेगवान अर्धशतक

Suryakumar Yadav Fastest Half Century | भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने टी20 क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर सूर्याने टी20 क्रिकेटमध्ये आपल्या 7 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध आयपीएल 2024 च्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) कडून खेळताना त्याने हा टप्पा गाठला.

टी20 क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा आठवा भारतीय फलंदाज ठरला आहे. तो फक्त विराट कोहली (12,310), रोहित शर्मा (11,200 प्लस), शिखर धवन (9,783), सुरेश रैना (8,654), एमएस धोनी (7,309), रॉबिन उथप्पा (7,272) आणि केएल राहुल (7,159) यांच्या मागे आहे. त्याच वेळी, इतर फक्त पाच भारतीय फलंदाजांच्या नावावर 6,000 पेक्षा जास्त टी20 धावा आहेत.

सूर्याचे मुंबईसाठी या मोसमातील सर्वात जलद अर्धशतक
सूर्यकुमार यादवने आरसीबीविरुद्ध या मोसमात मुंबई इंडियन्ससाठी सर्वात जलद अर्धशतक ठोकले. सूर्याने 17 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. बाद होण्यापूर्वी सूर्यकुमारने 19 चेंडूंचा सामना केला आणि 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 52 धावांची जलद खेळी केली. सूर्याच्या नावावर 3301 आयपीएल धावा आहेत.

आयपीएलमध्ये मुंबईसाठी सर्वात वेगवान अर्धशतक (बॉल फेस)
16 – इशान किशन विरुद्ध एसआरएच, 2021
17- पोलार्ड विरुद्ध केकेआर, 2016
17- किशन विरुद्ध केकेआर, 2018
17- पोलार्ड विरुद्ध सीएसके, 2021
17- हार्दिक पांड्या विरुद्ध केकेआर, 2019
17- सूर्यकुमार यादव विरुद्ध आरसीबी, 2024

आकाशदीपने षटकात 22 धावा दिल्या.
आरसीबीविरुद्ध सूर्यकुमार जुन्या रंगात दिसला. दिल्लीविरुद्ध खाते न उघडता बाद झालेल्या सूर्यकुमारने आरसीबीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सूर्याने आरसीबीचा वेगवान गोलंदाज आकाशदीपला लक्ष्य केले. आरसीबीसाठी 11वे षटक टाकणाऱ्या आकाशदीपच्या षटकात सूर्याने एक चौकार आणि तीन षटकारांसह एकूण 22 धावा घेतल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

“पुण्यात भाऊ, तात्या कोणी नाही, तर मुरलीधर मोहोळच निवडून येणार”, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

Ajit Pawar | “तुम्ही मला मूर्ख समजू नका, मी…”, अजित पवार ‘त्या’ प्रश्नावर भडकले

Vasant More | रवींद्र धंगेकर आमदार होऊनही कसब्यात विकासकामे झाली नाहीत