रेल्वे अपघाताच्या ठिकाणी पोहोचलेल्या रेल्वे मंत्र्यांनी ‘या’ व्यक्तीची भेट घेवून आभार मानले 

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे गुरुवारी भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. पटनाहून गुवाहाटीला जात असताना हा अपघात झाला.

बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचे एकूण 6 डबे रुळावरून घसरले. या अपघातादरम्यान पद्मश्री करीम-उल-हक यांनी रेल्वे अपघातातील जखमींना आपल्या दुचाकीवर बसवून गावकऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात नेले. ग्णवाहिका घटनास्थळी पोहोचू शकली नाही, तेव्हा पद्मश्रींनी बाईकचा वापर बाईक अॅम्ब्युलन्स म्हणून केला.

रेल्वे अपघातानंतर करीम-उल-हकने दाखवली माणुसकी

प्रत्यक्षात हा रेल्वे अपघात संध्याकाळी झाला आणि बचाव पथक पोहोचेपर्यंत अंधार झाला होता. या अपघातादरम्यान पद्मश्री करीम-उल-हक यांनी माणुसकी दाखवून अनेकांचे प्राण वाचवले. अर्धा डझनहून अधिक प्रवाशांना पद्मश्री करीमुल हक यांनी रुग्णालयात नेले.

रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली

अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही जलपाईगुडीच्या घटनास्थळी पोहोचले. तेथे पोहोचल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी करीमुल हक यांचीही भेट घेऊन त्यांचे आभार मानले. प्रवाशांचे प्राण वाचवून तुम्ही माणुसकी दाखवली असल्याचे मंत्री म्हणाले.