विद्यार्थ्यांनी ट्रेन पेटवून दिली; YouTube फेम खान सरांसहीत ४०० जणांविरोधात FIR दाखल

पटना – रेल्वेच्या एनटीपीसी परीक्षेत घोटाळा झाल्याच्या आरोपांनंतर उत्तर प्रदेश, बिहारमध्ये विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्शनं केली आणि त्याला हिंसक वळणही लागलं. गयामध्ये या आंदोलनातील तरूणांनी एका ट्रेनवर दगडफेक करत ट्रेनला आग लावल्याचीही घटना घडली. याच प्रकरणी आता सोशल नेटवर्किंगवरुन प्रसिद्ध झालेले खान सर आणि इतर काही संस्थांबरोबरच एकूण ४०० जणांविरोधात पाटणा पोलिसांनी एफआयआर दाखल केलीय.

खान सरांबरोबरच अन्य कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांविरोधातही विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप करण्यात आलाय. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत क्लासच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भडकावल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी कोचिंग क्लासच्या शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केलाय.

विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहून आपण हिंसा आणि जाळपोळ केल्याची कबुली दिलीय. या व्हिडीओमध्ये खान सर यांनी आरआरबी एनटीपीसी परीक्षा रद्द न केल्यास विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यासंदर्भात वक्तव्य केल्याचं सांगितलं जात आहे.