Sunil Kamble : पोलिसाला मारहाण प्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळेंवर गुन्हा दाखल

Sunil Kamble Slaps Police: पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीयपंथीया करीता विशेष वॉर्ड तयार करण्यात आला असून त्याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र या कार्यक्रमावेळी भाजपा आमदार सुनील कांबळे वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले. सुनील कांबळे यांनी भर कार्यक्रमात एका पोलिस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलीस कर्मचाऱ्याला कानाखाली मारल्या प्रकरणी भाजपचे आमदार सुनील कांबळे यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत घडलेल्या या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात आमदार कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याला देखील मारहाण केली होती.

महत्वाच्या बातम्या-

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळवर होता दहशतवाद्याला जेलमध्ये गळा दाबून मारल्याचा आरोप

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळ प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

आता झोपेतही वजन कमी करता येणार! जाणून घ्या Weight Lossच्या सोप्या टिप्स