या व्यवसायात होते खर्चापेक्षा कितीतरी पटीने जास्त कमाई, एकदा हा व्यवसाय करून तर पहा 

पुणे : आजकाल शेती हे केवळ उपजीविकेचे साधन राहिलेले नाही. अनेक सुशिक्षित लोक शेतीकडे वळत आहेत आणि बंपर कमावत आहेत. आजकाल भारतातील शेतकरीदेखील पारंपारिक पिके (Traditional crops) सोडून नगदी आणि औषधी वनस्पतींची तीं लागवड करत आहेत. यामुळे त्यांचे उत्पन्न वाढण्यासही मोठी मदत होत आहे. जर तुम्हालाही बंपर कमाईचे पीक घ्यायचेअसेल तर आज आम्ही तुम्हाला अशा पिकाबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये तुम्ही घरबसल्या अनेक पटींनी टीं नफा कमवू शकता.

आज आम्ही तुम्हाला अश्वगंधा शेतीबद्दल सांगत आहोत(Ashwagandha farming) . अश्वगंधाची लागवड (Cultivation of Ashwagandha) करून शेतकरी कमी वेळात अधिक नफा मिळवून श्रीमंत होऊ शकतात. भारतात हरियाणा, राजस्थान,महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, केरळ, आंध्र प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये अश्वगंधाची लागवड केली जाते(Haryana, Rajasthan, Maharashtra, Uttar Pradesh, Gujarat, Punjab, Kerala, Andhra Pradesh and Jammu and Kashmir).  खाऱ्या पाण्यातही त्याची लागवड करता येते.

 शेती कशी करावी

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात याची लागवड केली जाते. चांगल्या पिकासाठी जमिनीत ओलावा आणि कोरडे हवामान (Dry weather) असावे. रब्बी हंगामात (Rabbi season) पाऊस झाल्यास पीक चांगले येते. नांगरणीच्यावेळी शेतात सेंद्रिय खत (Organic manure)  टाकले जाते. पेरणीसाठी हेक्टरी 10-12 किलो बियाणे पुरेसे आहे. 7-8 दिवसात बियाणे उगवतात. वालुकामय चिकणमाती आणि लाल माती (Sandy loam and red clay) त्याच्या लागवडीसाठीचांगली मानली जाते. ज्या मातीचे पीएच मूल्य ७.५ ते ८ असते, त्या जमिनीचे उत्पादन चांगले राहते. 20-35 अंश तापमान आणि 500 ते 750 मिमी पाऊस रोपांच्या चांगल्या वाढीसाठीआवश्यक आहे. अश्वगंधा रोपाची कापणी जानेवारी ते मार्च या कालावधीत केली जाते.

सर्व औषधी वनस्पतींमतींध्ये अश्वगंधा सर्वात प्रसिद्ध आहे. तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी अश्वगंधा सर्वात फायदेशीर मानली जाते. अश्वगंधाच्या अनेक उपयोगांमुळे तिची मागणी नेहमीच राहते. अश्वगंधाची फळे, बिया आणि साल वापरून अनेक प्रकारची औषधे बनवली जातात. त्याची लागवड करून शेतकरी भात, गहू आणि मक्याच्या लागवडीपेक्षा 50टक्क्यांपर्यंत अधिक नफा कमवू शकतात. त्यामुळेच बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांतील शेतकरीही मोठ्या प्रमाणावर अश्वगंधाची लागवड करत आहेत. अश्वगंधाच्या मुळालाघोड्यासारखा वास येतो म्हणून तिला अश्वगंधा म्हणतात. अश्वगंधा हे औषधी पीक आहे. ही एक झुडूप असलेली वनस्पती आहे. खर्चाच्या कितीतरी पटीने नफा मिळत असल्याने यालानगदी पीक असेही म्हणतात.