SRH ची चपळाई! भारताविरुद्ध विश्वचषक अंतिम सामन्यात शतक ठोकणाऱ्या धाकड ऑस्ट्रेलियन फलंदाजाला घेतले विकत

IPL 2024 Auction: दुबईत आयपीएल २०२४च्या हंगामासाठी मिनी लिलाव सुरू झाला आहे. या लिलावात ३३३ खेळाडूंवर बोली लागणार आहेत. मल्लिका सागर या भारतीय लिलावकर्त्या यांच्याकडे यंदा लिलावाची सुत्रे देण्यात आली आहेत. 

दरम्यान ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज ट्रॅव्हिस हेड याला विकत घेण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात चुरशीची लढत झाली. हेडने वनडे विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध शतक ठोकत संघाला विश्वविजेते बनवले होते. त्यामुळे हेडवर सर्व आयपीएल फ्रंचायझींच्या नजरा होत्या. २ कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरलेल्या हेडला हैराबादने ६.८ कोटी विकत आपल्या ताफ्यात घेतले आहे. यामुळे आता हैदराबादची फलंदाजी फळी मजबूत बनली आहे.

महत्वाच्या बातम्या-

रामदास आठवले यांचा वाढदिवस रिपब्लिकन पक्षातर्फे संघर्षदिन म्हणून देशभर साजरा होणार

‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित साडे सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार’

राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत