Tuljapur | गर्भवती महिलेला चुकीचे इंजेक्शन दिल्याप्रकरणी; दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा समाप्त 

Tuljapur – प्राथमिक आरोग्य केंद्र दहीफळ ता.कळंब, येथे गर्भवती महिलेला चुकीचे इंजेक्शन दिल्या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांनी कठोर कार्यवाही करत दोन वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या सेवा तात्काळ समाप्त केल्या आहेत.तर एका नियमित वैद्यकिय अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. अधिकार नसताना चुकीचे इंजेक्शन देणाऱ्या आरोग्य सेवकाचे निलंबन करण्यात आले आहे.

सर्व आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रम प्रभावीपणे राबवून आरोग्य सेवेचा दर्जा उच्च राखत असताना निष्काळजीपणे वागणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर यापुढेही कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियमीत उपस्थिती आधार लिंक बायोमेट्रिक द्वारे तपासण्यात येते.कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख करण्यासाठी लवकरच जी.पी.एस.हजेरी प्रणाली राबविण्याचा आरोग्य विभागाचा मानस आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

या प्रकरणातील गर्भवती मातेची प्रकृती स्थिर असून सद्यस्थितीत माता व बालक सुरक्षित आहेत.दर १५ दिवसाला या मातेची तपासणी केली जाणार आहे.अशी माहिती जिल्हा (Tuljapur) आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या : 

Loksabha Election: भाजपकडून लोकसभेसाठी २३ निवडणूक निरीक्षकांची घोषणा, वाचा संपूर्ण यादी

Rohit Pawar – फडणवीसांवर बोलल्यावर एसआयटी लागते, पेपर फुटी करणाऱ्यांवर कारवाई का नाही?

Pankaja Munde | पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढणार नाहीत? भाजपच्या ‘त्या’ यादीत आलं नाव