वारं फिरलं : राष्ट्रवादी समर्थक आमदार फडणवीसांच्या बंगल्यावर

मुंबई – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

राजीनाम्यानंतर भाजपच्या (BJP) गोटात आनंदाचे वातावरण आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकासआघाडी सरकारच्या अडचणी वाढत आहेत. कारण आणखी एक समर्थक आमदार हा भाजपच्या गोटात जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांच्या बंडखोरीनंतर अनेक आमदार हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. तर काही अपक्ष आमदार भाजपसोबत जात आहेत. त्यात आता आणखी एका नावाची भर पडत आहे.

आमदार श्यामसुंदर शिंदे (Shyamsunder Shinde) सागर बंगल्यावर (Sagar Bungalow) दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची बैठक सुरू आहे. शामसुंदर शिंदे हे राष्ट्रवादी समर्थक अपक्ष आमदार आहेत. पण उद्या ते भाजपला समर्थन देण्याची शक्यता आहे. दरम्यान, केवळ शिंदे हेच नव्हे तर आता आणखी काही आमदार भाजपच्या बाजूने जातील असं सांगण्यात येत आहे.