Vastu Shastra | रात्री झोपताना उत्तरेकडे पाय करुन झोपल्यास काय होते? जाणून घ्या

Vastu Shastra | वास्तुशास्त्रात घर, कुटुंब आणि जीवनशैलीसाठी दिशांना खूप महत्त्व दिले जाते. घर बांधताना ज्याप्रमाणे दिशा लक्षात ठेवल्या जातात, त्याचप्रमाणे आपल्या खाण्या-झोपण्यासाठीही दिशा महत्त्वाची असते. वास्तुमध्ये असे म्हटले आहे की झोपण्याच्या दिशा देखील खूप महत्वाच्या असतात. जर तुम्ही तुमचे डोके किंवा पाय चुकीच्या दिशेने करुन झोपले तर तुमची झोप खराब होईल आणि तुमचे आरोग्यही चांगले राहणार नाही. असे म्हटले जाते की उत्तरेकडे पाय ठेवून झोपणे खूप फायदेशीर आहे. आज जाणून घेऊया पाय उत्तरेकडे करून झोपण्याचे काय फायदे आहेत?

पाय उत्तरेकडे करून झोपण्याचे फायदे
वास्तुशास्त्रात (Vastu Shastra) उत्तर दिशेला सकारात्मक दिशेचा दर्जा देण्यात आला आहे. असे म्हटले जाते की उत्तर दिशेला पाय करुन झोपल्यास सकारात्मक ऊर्जा त्याकडे आकर्षित होते आणि म्हणूनच झोपेसाठी ही दिशा सर्वोत्तम आहे. वास्तूमध्ये असे सांगितले आहे की, तुमचा पलंग अशा प्रकारे असावा की झोपताना तुमचे पाय उत्तर दिशेला आणि तुमचे डोके दक्षिण दिशेला असावे. यामुळे जीवन आनंदी राहते आणि घरात सुख-समृद्धी राहते.

मानसिक आरोग्यासाठी चांगले
वास्तूमध्ये असे म्हटले आहे की उत्तरेकडे पाय करुन झोपल्याने आरोग्य चांगले राहते आणि व्यक्ती सकारात्मक विचाराने श्रीमंत बनते. उत्तरेकडे पाय ठेवून झोपल्याने वैवाहिक जीवनातही आनंद टिकून राहतो. ही दिशा मानसिक आरोग्यासाठी चांगली मानली जाते आणि या दिशेला पाय करून झोपल्यास तुमचे मानसिक आरोग्यही चांगले राहते. उत्तरेकडे पाय ठेवून झोपल्याने चांगली झोप तर येतेच पण सकाळी उठल्यावर थकवा जाणवत नाही आणि संपूर्ण दिवस ऊर्जेने जातो. तथापि, वास्तु देखील झोपण्यासाठी दक्षिण दिशा उत्तम मानते कारण चुंबकीय शक्तीचा प्रवाह दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे असतो.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

सूचना- हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. त्याचा अवलंब करण्यापूर्वी वास्तूशास्त्रातील तज्ञांचा सल्ला घ्यावा. आझाद मराठी त्याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या : 

Maharashtra Politics | ‘गेली शिवशाही, आली गुंडशाही’ , विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा जोरदार निषेध

जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही, दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन : Rajesh Tope

Interim Budget | राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक ध्येयधोरणांची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी