Vijay Shivatare | आवाका दाखवणाऱ्याला आता आवाका कळेल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत तब्बल दीड तास चर्चा केल्यानंतरही विजय बापू शिवतारे (Vijay Shivatare) यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर (Ajit Pawar) निशाणा साधला, मागील काही दिवसांपासुन शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसून येताहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होईल असं जवळपास निश्चित मानलं जातंय. अशातच विजय बापू शिवतारे यांनी देखील बारामती लोकसभा मतदारसंघात अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केला.

एकीकडे अजित पवार यांनी बारामती लोकसभेसाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे, तर दुसरीकडे विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांच्या निर्णयाने अजित पवारांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना काही दिवसांपूर्वी शांत राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र विजय शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विजय शिवतारे यांच्याशी चर्चा केलीय, या चर्चेनंतर विजय शिवतरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत तुझा आवाका किती, तो बोलतो किती, तू कसा निवडून येतो, हेच बघतो, अशा शब्दात अजित पवारांनी विजय शिवतारे यांच्यावर टीका केली होती, आणि त्या विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांचा पराभव झाला होता अर्थात हा पराभव विजय शिवतारे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता आणि त्यामुळे त्या पराभवाची जखम शिवतारे अजूनही विसरलेले नाहीत, त्यामुळे आता त्याच शब्दात विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर पलटवार केलाय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | घर फुटलं खूप वाईट वाटतंय, श्रीनिवास पवार यांच्यानंतर बड्या नेत्याचा अजित पवारांना टोला

Shrinivas Pawar | पवार नाव संपवण्यासाठी भाजपाने ही चाल खेळली, श्रीनिवास पवार यांनी भाजपावर केली खोचक टीका

Chandrasekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आता तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते, बावनकुळे यांची टीका