Vijay Shivatare | बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भाजप कडून लढण्यास मी तयार

Vijay Shivatare | लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election 2024) महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू आहे. महायुतीतील भाजपा पक्षाने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करत प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा निर्माण झाल्याने इतर पक्षांनी आपली उमेदवारी घोषित केली नसल्याचे चित्र आहे. अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात (LokSabha Election 2024) महायुतीत कलगीतुरा सुरु असून माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी घेतलेली भूमिका राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरत आहे.

यातच आता विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भाजप कडून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ भाजपने घ्यावा आणि भाजपकडून कमळच्या चिन्हावर बारामती मधून निवडणूक लढण्यास मी तयार आहे असे त्यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, सध्या राज्यात अशा प्रकारची अदलाबदल इतर मतदारसंघात सुरू आहे. ⁠⁠भाजपकडून कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यास शिवतारे तयार मात्र घड्याळ चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास शिवतारे तयार नाहीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अजित पवार हे देखील मला स्वीकारणार नाहीत आणि माझी ही तयारी नाही.

इतर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार करण्याची किंवा प्रचार न करण्याची भूमिका घेत आहे. हा प्रकार म्हणजे ब्लॅकमेलिंग असल्याचं शिवतारे यांनी म्हटलं आहे
पक्ष शिस्तीपेक्षा मला बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचं महत्त्वाचं आहे त्यासाठी पक्षाची चौकट मोडावी लागली तरी माझा निर्णय अंतिम आहे आणि बारामती मधून निवडणूक लढवणार असे त्यांनी म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आमची लढाई – Muralidhar Mohol

Eknath Shinde | मोदींना औरंगजेबाची उपमा देणं म्हणजे देशद्रोह, एकनाथ शिंदे यांचा संजय राऊत यांच्यावर हल्ला

Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होताच पुण्यातील कॉंग्रेसमधील जेष्ठ नेता नाराज