Crime News | पुणे विद्यापीठात नेमकं चाललंय काय ? किरकोळ वादावरून विद्यार्थ्याला मारहाण

Crime News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गृपावरील पोस्ट डिलीट केल्याच्या वादावरून युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्याला जबर मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. या मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राम थरकुडे, वैभव दिघे, करण वाकवडे आणि इतर ६ गुंडांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अभाविपने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, गुरुवार, दिनांक २१ मार्च २०२४ रोजी रात्री बॉईज हॉस्टेल या व्हॉट्सऍप गृपवर राम थरकुडे या युवासेनेच्या (उ.बा.ठा गट) कार्यकर्त्याने धांगेकर यांच्या उमेदवारी ची पोस्ट टाकली. सदर पोस्ट राजकीय असल्याने ऍडमिन असलेल्या विद्यार्थ्याने ही पोस्ट डिलीट केली शुक्रवारी या किरकोळ कारणावरून राम थरकुडे, वैभव दिघे, करण वाकवडे आणि इतर ८ जणांनी या विद्यार्थ्याला जबर मारहाण (Crime News ) केली.

लाकडी काठी, खुर्ची विद्यार्थ्याच्या डोक्यात घालून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ केले आहे. अडविण्यासाठी गेलेल्या या काही विद्यार्थ्यांना जातीवाचक शिवीगाळ देखील करण्यात आली आहे. सदर गुंड हे बाहेरून विद्यार्थ्याला मारहाण करण्याच्या हेतूने विद्यापीठात आले होते. सदर एकही कार्यकर्त्याचा विद्यापीठात अधिकृत ऍडमिशन नाही. विद्यापीठामध्ये गेल्या काही महिन्यांपासून गुंडांचा हैदोस वाढलेला आहे, या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी तसेच विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला आवारात येऊन बाहेरच्या गुंडांनी मारहाण केल्यामुळे विद्यापीठाने देखील पोलिसात तक्रार करावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आमची लढाई – Muralidhar Mohol

Eknath Shinde | मोदींना औरंगजेबाची उपमा देणं म्हणजे देशद्रोह, एकनाथ शिंदे यांचा संजय राऊत यांच्यावर हल्ला

Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होताच पुण्यातील कॉंग्रेसमधील जेष्ठ नेता नाराज