Vijay Shivatare | सेल्फी काढत फिरल्याने आणि संसदरत्न होऊन लोकांची कामं होत नाहीत, शिवतारेंची टीका

बारामती लोकसभा मतदारसंघातून रणशिंग फुंकलेले शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) हे सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका करत आहेत. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. निव्वल सेल्फी काढत फिरल्याने आणि संसदरत्न होऊन लोकांची कामं होत नाहीत, अशी टीका विजय शिवतारेंनी (Vijay Shivatare) सुप्रिया सुळेंवर केली आहे.

पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना विजय शिवतारे म्हणाले, सुप्रियाताईंनी गेल्या १५ वर्षांत एक रुपयाचं तरी काम केलं का सांगा. निव्वळ सेल्फी काढत फिरल्याने आणि संसदरत्न होऊन लोकांची कामं होत नाहीत. तुम्हाला तळागाळात जाऊन लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात. फंड नको पण सुप्रियाताईंनी या मतदारसंघातले काम तरी केले का? महाविकास आघाडीची सत्ता असताना पुरंदरच्या गुंजवणीच्या प्रकल्पांसाठी त्यांनी किती प्रयत्न केला? एका ठिकाणी असलेलं आमचं विमानतळ का शिफ्ट करण्यात आलं? असा प्रश्नही यावेळी शिवतारेंनी केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune LokSabha 2024 | फडणवीसांच्या भेटीनंतर चक्रे फिरली; मुळीक बंधू लागले मोहोळांच्या प्रचाराला !

Pune News | पाटलांना फडणवीसांची तंबी? विधानसभेचे बघू, आधी लोकसभा उमेदवाराचा प्रचार करण्याचे निर्देश

 वरुण गांधी यांचे तिकीट कापले; भाजपचा धाडसी निर्णय