लाखो विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्यास प्रवृत्त करणारा हिंदुस्थानी भाऊ नेमका कोण आहे ?

मुंबई – राज्यातील महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन परीक्षा (ofline exam) घेण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. पण, या निर्णयाच्या विरोधात नागपूर, मुंबई, पुणे आणि बीडमध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी रस्त्यावर उतरत सरकारला घाम फोडला. मुंबईत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikawad) यांच्या घराबाहेरच विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली.

कोरोनामुळे ( Corona ) मागील दोन वर्षांपासून शाळा आणि महाविद्यालय हे ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. या वर्षीही ऑनलाइन वर्ग ( Online Classes ) घेण्यात आले. काही दिवसांपूर्वीच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Education Minister Varsha Gaikwad ) यांनी दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ( Board Exams Timetable ) केले. इयत्ता १२ वीच्या परीक्षा ४ मार्चपासून तर दहावीच्या परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार असल्याचे सांगितले. हे सांगतानाच या दोन्ही वर्षाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार, असेही शिक्षण मंत्र्यांनी सांगितल होते. शिक्षणमंत्र्यांच्या याच निर्णयाच्या विरोधातविद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला.

दरम्यान, महत्वाची बाब म्हणजे या आंदोलनामागे हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) या नावाने परिचित असलेला विकास पाठक (Vikas Pathak) हा व्यक्ती असल्याचं सांगितले जातआहे. आज तीन महिने झाले हे विद्यार्थी वर्षा गायकवाड यांना सांगत आहेत. विद्यार्थ्यांचा आवाज त्यांनी ऐकला नाही. त्या विद्यार्थ्यांनी आज माझ्या आवाहनाला प्रतिसाद दिला तर मी वाईट झालो का? असा सवाल हिंदुस्तानी भाऊने केलाय.

हिंदुस्थानी भाऊ नेमका कोण? –

हिंदुस्थानी भाऊचं खरं नाव विकास पाठक आहे. तो सोशल मीडियावर हिंदुस्थानी भाऊ म्हणून प्रसिद्ध आहे. विकास पाठक हा युट्यबर म्हणून देखील प्रसिद्ध आहे. तो बीग बॉसच्या १३ व्या पर्वात देखील सहभागी झाला होता. त्याच्या शिवराळ भाषेमुळे २०१६ मध्ये पहिल्यांदा तो प्रकाशझोतात आला होता. त्याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात. तसेच तो पाकिस्तान आणि इतर विरोधकांना आक्षेपार्ह भाषेत आव्हान देऊन प्रसिद्धीझोतात राहण्याचा प्रयत्न करत असतो.