ओबीसी जनगणना व आरक्षणाच्या मागणीसाठी वंचितचे जामखेड तहसील कार्यालयावर यल्गार मोर्चा

अहमदनगर : वंचीत बहुजन आघाडी जामखेड तालुक्याच्या वतीने भटके-विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक अँड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली रोजी जामखेड तहसील कार्यालयावर यल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये तीन हजारांहून अधिक आंदोलनकर्ते उपस्थित होते,ओबीसी आरक्षण, मुस्लिम समाजाचे ५% आरक्षण,भटके-विमुक्तांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची अमंलबजावणी,पारधी विकास आराखडा योजनेची अमंलबजावणी, भटके-विमुक्त आदिवासींचे रेशन कार्ड, आधार कार्ड, जातीचे दाखले, मतदार यादीत नाव ,तसेच २ गुंठे जागा देण्याचा प्रश्न,विधवा परितक्ता वयोवृद्धांना ३०००रु मानधनात वाढ करणे, लोककलावंतांना व वारकऱ्यांना ३०००रु मानधन देणे,दलित वस्ती विकास निधीत वाढ करून सर्व नागरी सुविधा पुरवणे या मागण्या मान्य करण्यासाठी ॲड. डॉ अरुण जाधव यांनी पोतराजाचे वेषांतर केले होते.

यावेळी अँड.जाधव यांनी आपल्या मनोगतात ,स्वातंत्र्य मिळवून ७०पेक्षा जास्त वर्ष होऊन सुद्धा नागरिकत्वाचा पुराव्यासाठी आंदोलने आणि मोर्चे काढण्याची पाळी येते तर या पेक्षा मोठ कुठल दुर्भाग्य नाही असं मत त्यांनी व्यक्त केल. यावेळी त्यांनी ओबीसींचे पंचायत राज व्यवस्थेमधील आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी केली. तसेच भटके-विमुक्त ओबीसींची जनगणना करण्याची मागणी केली.

तसेच वंचीत बहुजन आघाडीचे राज्यउपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांनी आपल्या मनोगतात, सर्व ओबीसी, मुस्लिम,भटके-विमुक्त, वंचीत घटकांनी एकत्र येऊन मागणारे नाही तर देणारे सत्ताधारी बनण्यासाठी संघर्ष करा अस मत त्यांनी व्यक्त केल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकाधिकार आंदोलन संघटनेचे प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ यांनी केले.आपल्या प्रास्ताविकात त्यांनी इथल्या वंचीत समूहांनी जाग होऊन शिक्षण घेऊन आपल्या हक्क अधिकारांसाठी लढल पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं.

यावेळी द्वारका पवार,विकी सदाफुलें,ह.भ.प बाळासाहेब गाडे महाराज,रावसाहेब खोत,तान्हाजी बनसोडे,मौलाना खलील तामसी,अरविंद सोनटक्के,स्वप्नील खाडे, आदींची भाषणे झाली. मागण्यांचे निवेदन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी स्वीकारले, त्यांनी आपल्या मनोगतात सर्व मागण्या शासन दरबारी पोहचवण्यात येतील व ज्या मागण्या तहसील अधिकारातील आहेत त्या मागण्यांवर लवकरात लवकर कारवाई करू असे आश्वासन त्यांनी दिले.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=b7O0djiTTzI&t=17s

You May Also Like